राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधि
महात्मा तंटा मुक्त गाव समिती गेवर्धा यांचे पुढाकाराने आज एक प्रेमी युगल विवाह बंधनात अडकले. सविस्तर जयंत वासुदेव खुणे मु.पो. देऊळगाव ता.कुरखेडा जि. गडचिरोली आणि पौर्णिमा बाजू उसेंडी मु.काकडयेली पो.दूधमाळा ता.धानोरा जि.गडचिरोली पार्सल कामातून ओळखी झाली,ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोघांनी तंटामुक्त समिती पदाधिकारी गेवर्धा यांची भेट घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली.तंटामुक्त समितीने यासंदर्भात निर्णय घेऊन आज दि.16 रोज गुरुवारला तंटामुक्त समिती पदाधिकारी, ग्रा.पं.पदाधिकारी यांचे उपस्थितीत दोघांचा विवाह सांस्कृतिक सभागृह ग्रा.पं.गेवर्धा या ठिकाणी पार पाडण्यात आला.
याप्रसंगी प्रशासक सुषमा मडावी, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई,माजी ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद,हेमंत शिडाम,ग्रामकोष समिती समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे,योगेश नखाते, मयुर चन्ने,चरणदास मडावी, भुवनेश्वर कांबळे,विनायक कुथे, सुनील किन्नाके, भोला पठाण,ग्रामपंचायत अधिकारी देवानंद भोयर, लाईनमेन अनिल बगमारे, राजन पा. खुणे, खुशाल दखणे,संदीप कुमरे ग्रा.पं. कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, मुकेश बोरकर, अमिता नाहामुर्ते,विनोद गावळे व गावकरी उपस्थित होते.



