Home Vidarbha विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करा… — भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये...

विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करा… — भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये नेतृत्वात यांच्या दिव्यांग बांधवांची मागणी…

   राकेश चव्हाण    

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रशासनाने विशेष सहाय्य योजनेच्या निकषात अलीकडे करण्यात आलेल्या बदलांविरोधात कुरखेडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

          भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी कुरखेडा चे तहसीलदार राहुल पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करून तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे.

         दिव्यांग बांधवाच्या या समस्या संदर्भात दिव्यांग बांधवांनी फाये यांना सदर समस्या सांगितली. चांगदेव फाये यांनी या प्रश्नसंदर्भात कुरखेडा तहसीलदार राहुल पाटील, संबंधित विभागाचे नायब तहसीलदार अनमदवार यांच्यासोबत चर्चा करून दिव्यांग बांधवांची समस्याप्रशासनिक अधिकारी यांचे लक्षात आणुन दिली.

          शासनाने दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने संजय गांधी दिव्यांग योजना अंमलात आणली आहे. या योजनेचा अनेक लाभार्थींना फायदा होत असतानाच, अलीकडील प्रशासनाच्या निर्णयामुळे फक्त कायमस्वरूपी युडी आयडी दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांनाच विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या अनेक लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

         मार्च-एप्रिलपासून तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात येणार असल्याने माहिती मिळाली असून संबंधितांवर शारीरिक, मानसिक व आर्थिक ताण वाढत असल्याची भावना दिव्यांग बांधवांनी केली.त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करून तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी चांगदेव फाये नेतृत्वातील शिष्टमंडळाने करण्यात आली. आहे.

         या निवेदन देताना तालुका महामंत्री विनोद नागपूरकर शहराध्यक्ष सागर निरंकारी भाजयुमो युवा तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख दिव्यांग लाभार्थी टिंकेश्वरी चौके, रमेश ठाकरे, तनुजा बळीराम दरवडे, फाल्गुन नारनवरे, हरिदास पोवडे, लिकित मस्के, शेषराव राऊत, दुलेश ठलाल, दयाराम तुलावी, दिलीप श्रीरामे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          दिव्यांग बांधवांच्या या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.