Home Social सामाजिक समता सप्ताह अंतर्गत ग्रामगीता महाविद्यालया तर्फे “स्वच्छता अभियान व संविधान जागर...

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत ग्रामगीता महाविद्यालया तर्फे “स्वच्छता अभियान व संविधान जागर संपन्न”…

  उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

              दिनांक 08 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे “भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत विविध उपक्रमांच्या आयोजन करण्यात आले होते. 

      या उपक्रमांतर्गत दिनांक 10 एप्रिल 2026 ते दिनांक 12 एप्रिल 2020 या दरम्यान चिमूर येथे काही लोकवस्त्यांमध्ये “स्वच्छता अभियान” व “संविधान जागर” कार्यक्रम राबविण्यात आले.हे कार्यक्रम महाराष्ट्र शासन,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सौजन्याने राबविण्यात आले.

         हे अभियान,डॉ.सुनंदा आस्वले,प्राचार्य,ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

       स्वच्छता अभियानांतर्गत,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काही लोक वस्त्यांमध्ये जाऊन तेथील कचरा,प्लास्टिक व नाल्यांची साफसफाई केली.

         तसेच त्या लोकवस्तीमधील लोकांना स्वच्छतेचे महत्व प्रा.डॉ.संदीप सातव,क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख,प्रा.डॉ.बिजनकुमार शील,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख व प्रा.डॉ.सुमेध वावरे,विद्यार्थी विकास विभाग प्रमुख यांनी समजून सांगितले.

       “संविधान जागर” अभियानाअंतर्गत लोकवस्त्यांमध्ये प्रत्येक कुटुंबाला भारतीय संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांच्या हस्ते देण्यात आली व तिचे महत्व लोकांना पटवून देण्यात आले. 

      हे दोन्ही अभियान राबविण्यासाठी महाविद्यालयातील दहा-दहा विद्यार्थ्यांचे समूह तयार करण्यात आले.या विद्यार्थी समूहाचे नेतृत्व दिलराज अंधेरेले,वैभव बारेकर,मुकेश भिमटे,निखिल झाडे,आफशान शेख,जुनेद पठाण,संगीता चौधरी,लावण्या धोटे,समीक्षा नन्नावरे,वैष्णवी सातपुते,तनुजा मेहरकुरे व आश्लेषा चन्नै या विद्यार्थ्यांनी केले.