Home Social वैरागड येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात संपन्न…

वैरागड येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात संपन्न…

राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी

      गडचिरोली जिल्हातंर्गत आरमोरी तालुक्यातील मौजा वैरागड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त,” प्रबुद्ध नवयुवक मंडळ वैरागड,यांच्या वतीने करण्यात आलेल्या जयंती उत्सव कार्यक्रम आनंद व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

            या कार्यक्रमाला आमदार श्री.रामदास मसराम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण,समता व सामाजिक न्याय यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

          कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे,माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम,धनपाल मिसार सर,माजी उपसभापती विनोद बावनकर,सरपंच संगीता पेंदाम,ग्राम प.सदस्य संगीता मेश्राम,राज नंदर्धने,मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.