शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा आवळगाव,हळदा येथील पोलिस दलात निवड झालेल्या मुलींचा रविवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने सत्कार करण्यात आला.
हळदा येथील कुमारी प्राची श्रीराम नरुले व योगिता दादाजी बावणे आणि आवळगाव येथील कुमारी शिवानी भास्कर गुरनुले या तीन मुलींची नुकतीच चंद्रपूर पोलिस दलात निवड झाली.
सदरहू निवड झालेल्या या मुलींचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव विनोद झोडगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या ध्येयवेड्या गरीब कुटुंबातील मुलींनी यशाला गवसणी घालून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.त्यांच्या या यशातून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन यश प्राप्त करावे असे आवाहन विनोद झोडगे यांनी केले.
तद्वतच या तिन्ही मुलींना पुढील वाटचालीच्या शुभेच्या देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच नरेश नखाते,शरद ठाकरे,संजय लोणारे,तंटामुक्ती अध्यक्ष लुमदेव खेवले,केशव बानबले,कैलास राऊत,सुरेश नखाते,मुखरु झोडगे,पत्रू मेश्राम,सुरेश ठाकरे,यादव मुलकर,यशवंत राऊत,धनराज उरकुडे,बाजीराव चिमूरकर,मधुकर राऊत,प्रवीण इटनकर,येमाजी भोपये,स्वप्नील चिमूरकर,गोविंदा चापले,सुनील चिमुरकर,विजय भोयर,भास्कर गुरनुले,दीपक मुंगूने,हेमंत गुरनुले,रेखा खरवडे,रेखा गुरनुले यासह अन्य भाकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.



