शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
ग्रामपंचायत शंकरपूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत शंकरपूरचे उपसरपंच श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी प्रमुख उपस्थित होते.तसेच माजी उपसभापती पंचायत समिती चिमूर श्री.रोशन ढोक,ग्रामपंचायत सदस्य सौ. सविताबाई चौधरी,श्रीमती यश्वकलाताई ढोक,सौ.सपनाताई घडसे,सौ. शारदाताई गायकवाड,विविध कार्यकारी सोसायटी शंकरपूरचे अध्यक्ष श्री.भाऊरावजी बावनकर यांची उपस्थिती लाभली.
याशिवाय कपिल भाऊ बघेल,संजय भाऊ भजभूजे,मुकेश भाऊ जुमडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व शंकरपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समता,शिक्षण आणि संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत शंकरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते.



