राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
देसाईगंज..
NSUI स्थापना दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) महाराष्ट्र प्रदेश यांच्या पुढाकारातून माता मंदिर, देसाईगंज येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार श्री रामदासजी मसराम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध आजारांवर मोफत तपासणी, औषधोपचार तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा NSUI चा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतला.
या प्रसंगी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीन राऊत, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेविका आशाताई दहिवले, नगरसेविका गुरमीतकौर चावला, नगरसेविका मंदा समर्थ, वीक्की रामाणी, काँग्रेस कमिटी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष कैलाश वानखेडे, काँग्रेस कमिटी आरमोरी विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर, प्रकाश समर्थ, आनंदसिंग चावला, काँग्रेसचे युवा नेते प्रशांत अंकमवार, वैष्णवीताई आकरे, सुधाकर राऊत, सागर बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन प्रदेश महासचिव विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य निशांत मनोज वनमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच NSUI तालुकाध्यक्ष देसाईगंज वैभव गोलाईत, NSUI उपाध्यक्ष देसाईगंज निशिकांत वाढई, NSUI उपाध्यक्ष देसाईगंज ओंकार कामथे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी NSUI च्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.



