राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी..
क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांची 199 वी जयंती महात्मा फुले चौक कुरखेडा येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम येथील जेष्ठ नागरिक श्री.आसारामजी माकडे आणि श्री.उद्धवरावजी राऊत यांचे हस्ते महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आले व तदनंतर द्वीप प्रजनन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
माळी समाज संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा तालुका माळी समाज संघटनेचे अध्यक्ष शाम सोनुले,गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार प्रा. डॉ.दशरथ आदे,अंनिस शाखा कुरखेडाचे अध्यक्ष सुरेश दहीकर,राजेंद्र बोरकर यांचे प्रमुख उपस्थितीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा उत्सव थाटात व आनंदमय वातावरणात पार पडला.
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडचिरोलीचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य सी.एल.डोंगरवार यांनी महात्मा फुलेंनी अन्याय-अत्याचारी रुढी परंपरा या संबंधाने केलेले कार्य आणि सद्यस्थिती या संबंधाने मनोगत व्यक्त केले.
श्री.रामभाऊ लांजेवार गडचिरोली जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी फुले दांपत्यांनी वंचित व बहुजन समाजाला जागृत करण्याचे केलेले कार्य,शैक्षणिक कार्य यावर प्रकाश टाकला.
तसेच फुले दांपत्याने केलेले अद्वितीय कार्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.
पुढील वर्ष हे क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या स्वरूपात करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने सौ. अरुणाताई राऊत,सौ.सुनीता आदे,सौ.माधुरीताई मुंगमोडे,सौ.मिनाक्षी आत्राम,सौ.शेंडे मॅडम,सौ.भैसारे मॅडम,कु.वैष्णवी माकडे,श्री.रवींद्रजी कुंभारे,श्री.पुरुषोत्तम भरणे सर,श्री.आत्राम सर,श्री.ओमप्रकाश सहारे,बाळ गोपाळ इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्री.याम सोनुले यांनी तर आभारप्रदर्शन श्री.केवळराम खुणे यांनी केले.



