भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दिनांक 10/04/2026 ला होमिओपॅथिक दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले व विविध आजारावर औषधोपचार करण्यात आले. तसेच अंगणवाडी केंद्र इंदिरानगर धानोरा येथे स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना व उपस्थितांना होमिओपॅथी बद्दल जनजागृती करण्यात आली.
तसेच उपस्थितांना “Homoeopathy Far Sustainable Helth ” या संकल्पनेद्वारे शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथि ही अशी उपचार पद्धती जी केवळ तात्पुरता आराम न देता शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कायमस्वरूपी मजबूत करण्यावर भर देते हे उपचार नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी आहे असे डॉक्टर मंजुषा लेपसे यांनी सांगितले.
या वेळी कार्यक्रमाचे उधघाट्टन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निशांत बांबोळे यांनी केले त्या वेळी डॉक्टर सीमा गेडाम डॉक्टर शीतल टेंभुर्णे, डॉक्टर सुनीता नरडगे,डॉक्टर शेख व रुग्णालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन श्री गिरीश लेंनगुरे यांनी केले.



