Home Maharashtra शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी,पालकमंत्री यांना निवेदन…

शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी,पालकमंत्री यांना निवेदन…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- दर्यापूर तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांमधिल सभासद शेतकऱ्यांना सध्या मिळणारी कर्ज मर्यादा अपुरी ठरत असल्याने ती वाढविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सादर करण्यात आले.

         सध्या शेतकऱ्यांना बँकेमार्फत तीन लाखापर्यंत कर्ज जाते. मात्र, दर्यापूर तालुका हा बहुतांश खारपाण पट्टा असल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे.शेती करतांना बियाणे,किटकनाशक, रासायनिक खते, व इतर औषधे व शेती खर्च भागवण्यासाठी अधिक आर्थिक सहाय्याची आवश्यकता भासत आहे. सध्याची कर्ज मर्यादा अपुरी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

         यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र सभासद शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा तीन लाखावरून पाच लाख रुपयापर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळून शेती उत्पादनात वाढ होईल व त्यांच्या आर्थिक स्थैर्यास चालना मिळेल हे निवेदन अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, संचालिका सौ. सुरेखाताई ठाकरे संचालक अजय मेहकरे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.

         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी, शहराध्यक्ष अमोल गहरवार तसेच जिल्हा सरचिटणीस कुलदीप पाटील काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मागणी तात्काळ मान्य करण्यात यावी.