Home Crime आरमोरी पोलिसांच्या कारवाईत…  — सुगंधित तंबाखूचा साठा जप्त… — दोघांवर...

आरमोरी पोलिसांच्या कारवाईत…  — सुगंधित तंबाखूचा साठा जप्त… — दोघांवर गुन्हा दाखल…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी – प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध आरमोरी पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल ६ लाख २१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई गुरुवारी करण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

          प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची साठवणूक करुन ठेवला असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी वैरागड येथे दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली.

          या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश पोसन्ना तोरेम यांच्या फिर्यादीनुसार पुंडलिक रमेश फुकटे (३३, रा. वासाळा) व सुनील वासुदेव उपरे (४२, रा. वैरागड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी केली.

६ लाख २१ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत…

          यात गावालगत असलेल्या गोदामातून तसेच एका किराणा दुकानातून यात ईगल हुक्का शिशा तंबाखू, होला हुक्का शिशा तंबाखू, मजा १०८, विमल पान मसाला, व्ही-१ टोबॅको यासह विविध प्रकारचे पाऊच व बॉक्स आदी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. याशिवाय या साठवणुकीसाठी व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक वॅगनआर कार, एक ट्रिशिका इलेक्ट्रिक मालवाहू डग्गा व एक चेतक कंपनीची इलेट्रिक स्कूटी असा एकूण ६ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.