शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
नागपूर विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी यांचे काल शुक्रवार दि.१०एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता एम.आय.डी.सी. दाताळा रोड चंद्रपूर येथील हाँटेल विला मध्ये एका भव्य कार्यक्रमाचे निमित्ताने आगमन झाले होते.
या वेळी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका तथा चंद्रपूर शहरातील योग शिक्षिका रंज्जू दिलीप मोडक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
या प्रसंगी प्रामुख्याने गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा श्री कन्यका बँकेचे अध्यक्ष डॉ.विजय आईंचवार,श्रीराम पान्हेरकर, योग प्रसारक पूजा चहारे यांची उपस्थिती लाभली होती.



