Home Maharashtra मुनघाटे महाविद्यालयात ‘सामाजिक समता सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला आयोजित…

मुनघाटे महाविद्यालयात ‘सामाजिक समता सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला आयोजित…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

    धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागा द्वारा ‘ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्य ‘ दिनांक ०८ एप्रिल ते दिनांक १४ एप्रिल २०२६ या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.

        यावेळी व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंकज चव्हाण तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.ज्ञानेश बनसोड आणि प्रा.मानतेश तोंडरे व्यासपीठावर उपस्थित होते. २०२६ हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे महाड येथील सत्याग्रहा संबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे महत्त्व प्रा ज्ञानेश बनसोड यांनी प्रतिपादन केले. तर संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्त्व प्रा.मानतेश तोंडरे यांनी प्रतिपादन केले.

         याप्रसंगी डॉ.विणा जम्बेवार,डॉ.गणेश चुदरी, डॉ. पंढरी वाघ, डॉ. नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा.प्रशांत वाळके, डॉ. सचिन धवनकर, डॉ.प्रवीण गोहणे, प्रा.कैलाश खोब्रागडे, प्रा. निवेदिता वटक, प्रा.भाविकदास करमनकर, प्रा.विराग रणदिवे, प्रा. संजय मांडवगडे तसेच प्रशासकीय कर्मचारी आणि रासेयो स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

      संचालन व प्रास्ताविक डॉ.प्रियंका पठाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.संजय मुरकुटे यांनी व्यक्त केले.