Home Maharashtra ग्रामगीता महाविद्यालयात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता” सप्ताहाची सुरुवात…  

ग्रामगीता महाविद्यालयात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता” सप्ताहाची सुरुवात…  

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

     ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे निर्णयानुसार तसेच गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांच्या परिपत्रकानुसार दिनांक 8 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2020 या कालावधीत “भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

      दिनांक 8 एप्रिल 2026 ला या सप्ताहाचे उद्घाटनाप्रसंगी भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना कार्यक्रमांची रूपरेषा सांगण्यात आली. 

       सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महाविद्यालयात दिनांक 9 एप्रिल रोजी संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा व व्याख्याने आयोजित करण्यात आले. 

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.संदीप सातव,प्रा.डॉ.निलेश ठवकर व प्रा.डॉ.सुमेध वावरे मंचावर उपस्थित होते. 

       डॉ.सुनंदा आस्वले यांनी कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या सामाजिक कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

       तसेच त्यांनी सांगितले की,संत गाडगे महाराज गावागावात जाऊन लोकांचे मार्गदर्शन करायचे व समाजामधील अंधश्रद्धा, भेदभाव,स्त्रियांसाठी वस्तीगृहे,विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे व स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून द्यायचे,याबद्दल मार्गदर्शन केले. 

    तसेच प्रमुख पाहुणे,प्रा.डॉ.संदीप सातव व प्रा.डॉ.निलेश ठवकर यांनी सुद्धा सामाजिक समता सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. 

        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक,प्रा.डॉ.सुमेध वावरे यांनी व संचालन प्रा.डॉ. बिजनकुमार शील यांनी तसेच आभार प्रदर्शन,प्रा.डॉ.सरताज शेख यांनी केले.

        हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.