Home Maharashtra चिमूर शहरासह,चिमूर तालुक्यात अवैध धंदे सुरु असताना,आमदारांसह अधिकारी चुप राहण्याचा काय प्रकार? ...

चिमूर शहरासह,चिमूर तालुक्यात अवैध धंदे सुरु असताना,आमदारांसह अधिकारी चुप राहण्याचा काय प्रकार?  — लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे भ्रष्ट्राचारात हात ओले झाले व होत आहेत काय?. — चिमूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनो,”वेश्याव्यवसायाकडे व इतर अवैध धंद्याकडे डोळेझाकपणा करु नये,”ओझ्यात दबू नये” गाफील राहू नये!…

  रोखठोक

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

    चिमूर तालुक्यात अवैध धंदे सुरु असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकारी थंडगार होत,”चुप बसले, असल्याचे चित्र आहे.

        संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे पद व अधिकार बासणात गुंडाळून ठेवण्याची किमया ज्यांनी कुणी केली असेल तो,”महाधुर्त तर आहेच,पण तो गुन्हेगारी पार्श्वभूमीतील डान आहे असेच दिसून येत आहे.

      चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांची,”ना घर का,”ना घाट का,अशी दैन्यावस्था करुन ठेवणारा तो कोण?,”हा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना आहे.

       चंद्रपूर सह चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना वाटत असेल की ते स्वाभिमानी,इमानदार,कर्तव्यतत्पर,कर्तव्यदक्ष आहेत,”तर त्यांना प्रश्न आहे, मग तुम्ही चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी का म्हणून कर्तव्य पणाला लावत नाही?.

       तद्वतच राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून जो कुणी चंद्रपूर सह चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी दबावात आणतो,दबाव टाकतो,त्याच्या विरोधात बंड का म्हणून सदर अधिकारी करीत नाही? माफीयाच्या त्या सरगमाला कायदेशीर उघडे का म्हणून पाडत नाही?

        चिमूर तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु ठेवणे म्हणजे सरळ सरळ भ्रष्ट्र यंत्रणेला चालना देणे होय.मग चिमूर तालुक्यातील भ्रष्ट्र यंत्रणा कुणाच्या छत्रछायेखाली काम करतय? भ्रष्ट्र यंत्रणेचा मोहरक्या कोण? हा प्रश्न चिमूर तालुक्यातील जनतेच्या निशाण्यावर आहे.

      चिमूर तालुक्यातील नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की,चिमूर तालुक्यातील अधिकारी अवैध धंदे बंद करीत नाही,तर ते कुणाचे गुलाम बनून काम करतात?,त्यांना भिण्याचे कारण काय? आणि ते कुणाच्या रडारावर आहेत.

           अवैध धंदे बंद न करणे व मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु ठेवणे,यातून मिळणारी मिळकत,कुणाकुणाच्या खिशात पडतय?कोणकोण मालामाल होत आहेत? हा प्रश्न चिमूर तालुक्यातील जनतेला पडला आहे.

        म्हणूनच चिमूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीसह ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मालमत्तेची चौकशी महाराष्ट्र सरकारने करायला नको काय?

       कायद्याने एकदाचे काम करणे सुरू केले तर,”भ्रष्ट्र मायेत जे अधिकारी स्वत:ला सुरक्षित समजतात,त्यांची सुध्दा दानादान होतंय,हे संबंधित अधिकाऱ्यांना माहित नाही असे म्हणता येत नाही.

           चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी चिमूर तालुक्यातील अवैध धंद्यांकडे जातीने लक्ष देत अवैध धंद्यांचे वास्तव प्रकरण जनतेसमोर आणि चुप बसून असलेल्या चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या समोर आणले पाहिजे,असेच लोकमन आहे.

         चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकारी हे अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी अवैध धंदेवाईकांवर,”मेहरबानीवर मेहरबानी करीत आहेत,यामुळे त्यांना धडा कोण शिकवणार?,मात्र,संबंधित अधिकाऱ्यांची जनतेसमोर पत घसरली आहे,हे एवढे निश्चित!

चिमूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी वेळीच सावध व्हावे!…..

        वेश्याव्यवसाय हा अनेक मुलींचे,युवतींचे,महिलांचे,आणि युवक,पुरुषांचे आयुष्य बरबाद करणारा आहे.तद्वतच अनेकांचे संसार उद्धवस्त करणारा आहे,उघड्यावर आणणारा आहे.

       याचबरोबर वर्तमान व भविष्य काळात चिमूर तालुक्याला व चिमूर शहराला बदनाम करणारा आहे.यामुळे चिमूर शहरातील व चिमूर तालुक्यातील नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही.

         चिमूर शहरातंर्गत मानीक नगर मधून,०१ एप्रिल २०२६,रोज बुधवारला रात्रो साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान चिमूर पोलिसांनी ३ मुलींना ताब्यात घेतले.पण अधिक चौकशी न करता सोडून दिले.म्हणजेच वेश्याव्यवसायाचा धंदा करणाऱ्या मुख्य सुत्रधारांना संरक्षण देण्यात आले,वाचविण्यात आले.मग कारण कोणत्याही प्रकारची असोत..

          आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना वेश्याव्यवसायाची सर्व माहिती मानीक नगर येथील नागरिकांनी दिली.परंतू ते सुद्धा या प्रकरणाबाबत चुप बसले आहेत.

         चिमूर पोलिसांनी ना इमारत शिल केली,ना वेश्याव्यवसायाच्या सुत्रधाराला ताब्यात घेतले.याचा अर्थ एकच आहे,वेश्याव्यवसाय करणारे सुत्रधार हे एकतर भाजपासी संबंधित आहेत किंवा वेश्याव्यवसायाचे प्रकरण दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असावा?अशी शंका चिमूर तालुक्यातील नागरिकांना आहे.

आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विश्वास दाखवता येत नाही?…..

        आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या कार्यकाळातंर्गत चिमूर तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु झाले.नव्हे तर वेश्याव्यवसायांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे.

       चिमूर शहरासह चिमूर तालुकातंर्गत सट्टा धंदा तेजीत सुरु आहे,चिमूर शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात देशी दारुची अवैध विक्री नागरिकांना लाजवेल अशी सुरु आहे,चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू व मुरुमांचे अवैधरित्या उत्खन केले गेले व अवैध उत्खनन सुरु आहे.

     या अवैध धंद्यात भाजपाचे पदाधिकारी व भाजपाला पाठबळ देणारे गुंतले आहेत.यामुळे आमदार किर्तीकुमार भांगडिया हे अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढे ध्वजावत नाही असेच म्हणावे लागेल.

          याचबरोबर चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करु नये यासाठी तेच स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची शंका येत आहे.तद्वतच चिमूर तालुक्यात अवैध धंदे सुरु नसल्याबाबत तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना,मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक,चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना खोटी माहिती पुरवतात काय? अशी शंका येवू लागली आहे.

नागरिकांनी ओझ्याखाली दबू नये…..

         आमदार किर्तीकुमार भांगडिया हे कार्यक्रमाला भरपूर प्रमाणात रुपये देतात किंवा इतर प्रकारे रुपये देतात म्हणजे,त्यांची पुढच्या निवडणुकीची ते आतापासूनच तयारी करतात असे नागरिकांनी गृहीत धरले पाहिजे.

        तद्वतच ते काही कार्यक्रमाला,क्रिडा खेळांना आवश्यक रुपये देतात म्हणजे स्वत:च्या वाजवी कमाईतून देतात यावर विश्वास बसत नाही.

         मात्र,ते विद्यार्थ्यांच्या व बेरोजगारांच्या हितासाठी आणि भविष्यासाठी,महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहात कधीच बोलले नाही.याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक गंभीर प्रश्न,शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण समस्या अधिवेशनात त्यांनी लावून धरल्या नाहीत.

         बाहेर बोलणे आणि मंत्र्यांना चिमूर विधानसभा मतदारसंघात आणून लोकांच्या समोर मिरवून घेणे हा कर्तव्य भाग वेगळा,आणि विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना विधिमंडळात बोलेणे हा कर्तव्यचा भाग वेगळा ठरतो!

          अधिवेशन काळात विद्यार्थ्यांच्या,बेरोजगारांच्या, शेतकऱ्यांच्या,आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना अनुसरून विधिमंडळात बोलणे अतिशय महत्त्वाचे ठरते.विधिमंडळात बोलणे म्हणजे ते बोलणे रेकार्डबध्द होणे होय.

        श्री.किर्तीकुमार भांगडिया यांना मतदारांनी आमदार बनविले ते नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी,चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत नागरिकांसह ,बाह्य विकास करण्यासाठी!..

        चिमूर तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु ठेवण्यासाठी नाही,अवैध धंद्द्यातंर्गत तालुक्यातील खनिज संपत्तीची बरबादी करण्यासाठी नाही,अवैध धंद्द्यातंर्गत लोकांना बरबाद करण्यासाठी नाही.

            यामुळे चिमूर तालुक्यातील महिला/पुरुषांनी,बेरोजगारांनी,विद्यार्थ्यांनी,युवक-युवतींनी,शेतकऱ्यांनी,आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या ओझ्यात दबून राहण्याचे कारण दिसून येत नाही.

अवैध धंदे सुरु असलेले खालील छायाचित्रे…