Home Social दोन्ही मैत्रिणी झाल्या चंद्रपूर पोलीस!…

दोन्ही मैत्रिणी झाल्या चंद्रपूर पोलीस!…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

        2025-26 मध्ये झालेल्या पोलीस भरती मध्ये तालुक्यातील दोन मैत्रिणींची चंद्रपूर पोलीस मध्ये नुकतीच नियुक्ती झाली आहे.कु.मोनिका सौ.गीता मोहन ठवरे आणि ऋतुजा अंकुश गंधारे या दोघीही मैत्रिणींनी सोबत धावण्याचा सराव केला.या सरव दरम्यान मनोज तुमराम,राकेश मालोदे यांनी सदर विद्यार्थ्यांनींना वेळोवेळी मार्गदर्शन केले व दोघीही त्यात पास झाल्या.

       यानंतर त्यांना पेपरचे वारे लागले.शहीद वाचनालय चिमूर या ठिकाणी दोघीही मिळून अभ्यास केला.अथक प्रयत्न केले.घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना चिमूर या ठिकाणी दोघीही रूम करून राहायच्या.

        आई बाबांचे दिवस आपल्याला बदलायचे आहेत.हा दृष्टिकोन समोर ठेऊन अभ्यास केला आणि काल लागलेल्या पोलिस सिलेक्ट लिस्ट मध्ये या दोन्ही मैत्रीणींचे नाव झडकले. 

       सर्व मित्र,मैत्रिणी,आई, वडील निकाल पाहून आनंदी झाले.सर्व वाचनालयातील विद्यार्थ्यांनी मिळून सत्कार केला व बँडच्या ठोक्यावर नाचले आणि आनंद साजरा केला.