दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
विविध पर्यायांमुळे प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराला योग्य पर्याय मिळतो. याशिवाय, पूर्ण प्रॉपर्टी मॅनेजमेंट सेवा उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांना कोणतीही अतिरिक्त काळजी घ्यावी लागत नाही.
प्रश्न : ‘Phuket9’ च्या संस्थापक मिस पापाचसॉर्न मीपा (Kae) यांच्यासोबत काम करताना तुम्हाला नेमका कसा अनुभव आला? त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तुम्हाला सर्वाधिक काय भावले?
डॉ. सुनील व्ही. मांजरेकर : खरं सांगायचं तर मीपा यांच्यासोबत काम करणं हा केवळ व्यावसायिक अनुभव नाही, तर तो एक सांस्कृतिक आणि भावनिक प्रवास आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारं आहे. त्यांनी फुकेतमध्ये उभारलेल्या ‘दगडूशेठ हलवाई गणपती’ मंदिरात त्या नित्यनेमाने श्रद्धेने पूजा-अर्चा करतात – ही गोष्टच त्यांच्या संस्कारांची साक्ष देते. विशेष म्हणजे, त्या भारतात येऊन पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर महिन्याला किमान एकदा जाऊन दर्शन घेतात. एका परदेशी व्यक्तीला आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल इतकी ओढ आणि आदर आहे, हे पाहून मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. त्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने जोडतात. फुकेतमध्ये भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांनी यावं, आपल्या संस्कृतीचा विस्तार करावा आणि तिथे स्वतःचं एक घर निर्माण करावं, असं त्यांना वाटतंय. त्यांच्या दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प केवळ व्यवसाय न राहता, दोन संस्कृती जोडणारा आणि नाती निर्माण करणारा एक सुंदर उपक्रम बनतो.
प्रश्न : या प्रकल्पाला महाराष्ट्रातून कसा प्रतिसाद मिळत आहे?
डॉ. सुनील व्ही. मांजरेकर : मुंबईतील JW Marriott, सहार येथे झालेल्या परिषदेत महाराष्ट्रभरातून उद्योगपती आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि ही एक ‘सुवर्णसंधी’ असल्याची प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे, मराठी संस्कृतीची जोड असल्यामुळे भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर लोक या प्रकल्पाशी जोडले जात आहेत. आम्ही फुकेतमध्ये भारतीय समुदायासाठी एक मजबूत नेटवर्क उभे करण्याचा विचार करत आहोत. सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम आणि व्यवसायाच्या संधी यांचा एकत्रित विकास करून एक ‘मिनी महाराष्ट्र’ उभारण्याचे आमचे स्वप्न आहे.
फुकेतमधील रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या अधिक माहितीसाठी आणि संधी जाणून घेण्यासाठी Ms. Shreya Manjjarekar, SOC Corporation Properties LLC, Tel : +971 50 472 9635, +97145136075 Mob: +971505343653, sunil@sqccproperties.com मेलवर किंवा www.sqccproperties.com या वेबसाइटला भेट द्यावी.





