Home Social ज्युनियर वर्ल्डकपसाठी प्रितम केंद्रेची निवड, आळंदीत नगरपरीषदेत सत्कार…

ज्युनियर वर्ल्डकपसाठी प्रितम केंद्रेची निवड, आळंदीत नगरपरीषदेत सत्कार…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : इजिप्त येथे होणाऱ्या १० मीटर एअर रायफल शूटिंग ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धेसाठी आळंदीच्या प्रितम केंद्रे याची निवड झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आळंदी नगरपरीषदेत त्याचा सत्कार करण्यात आला.

        नगरसेवक दिनेश घुले यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, गटनेते सचिन गिलबिले, ज्ञानेश्वर वाघमारे दिपक काळे यांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते प्रितम केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.

        नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, “प्रितमने कठोर परिश्रम व सातत्याच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. ही आळंदीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. शहरातील तरुणांनी क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी हे यश प्रेरणादायी ठरेल. नगरपालिकेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला आवश्यक ते सहकार्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

      उपस्थित मान्यवरांनीही प्रितमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देत देशाचे प्रतिनिधित्व करताना तो यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला.प्रितम केंद्रे यांच्या या कामगिरीमुळे आळंदी शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले असून, विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.