शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- तथागत बुद्धला जेव्हा ज्ञान प्राप्त झाले,तेव्हा जगातील सर्वात मोठी अभुतपुर्व घटना घडली.मानवी जीवनातील अनेक जटिल प्रश्नांची उत्तरे मिळाली,म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण मानवी कल्याणासाठी बुद्ध धम्माचा मार्ग दिला असे महत्त्वपूर्ण मत प्रज्ञा राजुरवाडे यांनी व्यक्त केले.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या बुद्धधम्म हा आनंदी जीवन जगण्याची रोजची आचरण जीवनशैली आहे.मानवी जीवन दुःखाने भरलेले आहे,पण मानव जातीला कसे सुखी करावे हे बुद्धधमाचा पाया आहे.
मानवतेचे रक्षण धम्म करतो,धम्म हा वैक्तिक नसुन मानवीय हित साधणार मार्ग आहे.बुद्धधम्माच्या आचरण शैलीतुनच मानवी मनात वैश्विक मंगलमैत्री,चारित्र्य संपन्नता,प्रज्ञा- शील-करुणा हे संस्कार मूल्य रुजवून मानवी जीवनातील माणसाशी असलेले नाते मंगलमय कल्याणकारी होते व लोभ द्वेष अविद्या नष्ट होऊन बंधुता समता रुजते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात जो मानवी कल्याणाचा विचार दिला,तो प्रबुद्ध भारत निर्मितीसाठी बुद्धधम्माचा सार आहे.म्हणून हा प्रबुद्धविचार लोकचळवळ,आचरणशैली होऊन प्रबुद्ध परीवार निर्माण झाले तरच संविधानाच्या प्रस्तापणेतील उद्दिष्ट्ये आपण भारतीय साधू शकतो.
त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला प्रबुद्ध समाजनिर्मितीसाठी सर्वांनी कटिबद्ध असणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी सुभेदार रामजीबाबा आंबेडकर स्मृतीदीन व बौद्ध धम्म परिषद शिवनपायली येथे धम्म क्रांतीचे पाच सूत्रे व बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समाजनिर्मिती या धम्मपरिषद विषयावर भुमिका स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देवेश कांबळे प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी,उद्घाटक पी.एस.खोब्रागडे धम्मभूमी केळझर,आदित्य बोरकर,सरपंच जयपाल गावतुरे,किशोर आंबादे,महेंद्र डेकाटे,मंगेश भणारकर,वनसंरक्षन अधिकारी करिष्मा मेश्राम आदि उपस्थित होते.
यावेळी बौद्ध धम्मपरिषदेत आंबेडकर चळवळीतील मान्यवरांचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
उपासक उपाशीकांना बौद्ध धम्म समारंभात धम्मदेशना पूज्य भंदत शीलानंद महास्थवीर,पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर व भिखुसंघ,भदंत ग्यानरक्षित थेरो संभाजिनगर,पूज्य भन्ते डॉ. धम्मचेती,भन्ते शीलज्योती,भन्ते इंदूमनी यांची धम्मदेशना व मंगलमैत्री झाली व अश्विनी रोशन यांचा भिमगीत गायन झाले.
या बौद्धधम्म परिषदेत मोठ्या संख्येने उपासक उपाशीका हजर होते.या कार्यक्रमाचे संचालन जनार्धन डेकाटे यांनी केले तर प्रस्ताविक बालकदास पाटील केले.आभार रितिक गेडाम यांनी मानले.



