दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
रमाई आंबेडकर (रमाबाई आंबेडकर) या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणून ओळखल्या जातात, पण त्यांचे स्वतःचे जीवनही संघर्ष, त्याग आणि प्रेरणादायी आहे.
रमाई आंबेडकर – थोडक्यात परिचय…
पूर्ण नाव : रमाबाई भिकाजी आंबेडकर
जन्म : ७ फेब्रुवारी १८९८
जन्मस्थान : दापोली, जिल्हा रत्नागिरी (महाराष्ट्र)
विवाह : १९०६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी
मृत्यू : २७ मे १९३५
जीवन आणि संघर्ष…
रमाईंचे आयुष्य अत्यंत कठीण होते. बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असताना घरची सर्व जबाबदारी रमाईंच्या खांद्यावर होती.दारिद्र्य, आजारपण आणि सामाजिक अवहेलना यांचा त्यांनी धैर्याने सामना केला. त्यांना एकूण पाच मुले होती, पण दुर्दैवाने बहुतेक मुले लहान वयातच आजाराने मरण पावली.
बाबासाहेबांच्या जीवनातील भूमिका…
रमाई या बाबासाहेबांच्या संघर्षाच्या मूक पण मजबूत आधारस्तंभ होत्या. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि समाजकार्याच्या ध्येयासाठी त्यांनी स्वतःचे सुख कायम बाजूला ठेवले.बाबासाहेब त्यांना प्रेमाने “रामू” असे संबोधत.
स्मृती आणि सन्मान…
रमाई आंबेडकर या त्याग, संयम आणि निष्ठेचे प्रतीक मानल्या जातात.त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी रमाई आंबेडकर जयंती साजरी केली जाते.दलित आणि स्त्री चळवळीत रमाईंचे स्थान अत्यंत आदराचे आहे.
का महत्त्वाच्या आहेत रमाई आंबेडकर?…
कारण त्या फक्त एका महान व्यक्तीच्या पत्नी नव्हत्या, तर एका क्रांतीच्या पायाभूत आधार होत्या.असंख्य स्त्रियांना संघर्षात टिकून राहण्याची प्रेरणा देणाऱ्या होत्या.
रमाई बाबत विषेश
१९२३ पासुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला वकीलाचा व्यवसाय सुरु केला. रमाईला असे वाटू लागले कि, आपले पती संसाराला लागले हे पाहून स्वाध्वी रमाईला आनंद होणे स्वाभाविकच आहे. एकदा वकिलीची फिस म्हणून डाॅ. बाबासाहेबांना ३००रुपये मिळाले. तेव्हा ते सर्व त्यांनी रुमालात बांधून घरी जावून आपल्या पत्नीच्या स्वाधिन केले. इतके रुपये पाहुन रमाईचा आनंद गगनात मावेना कारण; इतके रुपये त्या मातेने जिवनात कधी पाहिले नव्हते. प्रत्येक स्ञिला वाटते की, आपल्या पतीने संसाराकडे लक्ष द्यावे. यावरुन त्या बाबासाहेबांना बोलत असत.
एकदा त्या खूप चिडल्या, बाबासाहेब म्हणाले “माझ्या नावाने सारखी ओरडत असतेस, मग मी काय करावे असे तुला वाटते..? त्यावर रमाई उदगारल्या; “अहो घरात भाजीपाला, तेल, मीठ, गहू, तांदूळ वगैरे लागतात. याकडे तरी कधी तुम्ही थोडे लक्ष द्यावे, कधी मुलाबाळांना जवळ घ्यावे, त्यांना ओंजारावे, बायकोशी दोन शब्द प्रमाने बोलावेत. परंतु तुमचे माञ सर्वच मुलखावेगळे, येउन-जाउन तुमची ती जाडजूड पुस्तके, त्यात सतत वाचन आणि तुम्ही” रमाईच्या डोळ्यात अश्रु होते, त्यांनी अनेक दिवसाची मनोव्यथा आपल्या पतीसमोर व्यक्त केली. तेव्हा ख-या परिस्थितीची जाणिव बाबासाहेबांना देखिल झाली. आणि त्या महामानवाचे डोळे पाणावले आणि ते रमाईला म्हणाले, “रामु… तु अशी साध्वी आहेस ना म्हणूनच मी असा राहु शकतो.
रमाईनी आपल्या संसारा विषयक भ्रामक स्वप्नांचे मोहपाश झुगारुन दिले, तात्काळ त्या स्वाभिमानाने उदगारल्या,”साहेब आपणास आपल्या कोट्यवधी अश्पृश्य बांधवाच्या, समाजाचा कल्याणाचा संसार करावयाचा आहे. रमाईचे हे उदगार ऐकून बाबासाहेबांच्या उत्साहास पुन्हा जागृती आली. कर्तृत्वाला चालना मिळाली. ध्येयस्थानाची नविन स्फुर्ती मिळाली. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाईनां आपले स्फुर्तीस्थान मानतात.
रमाईंनी पतीच्या कष्टमय जिवनात प्रामाणिकपणे साथ दिली. त्यांच्या अंगीकृत कार्यात त्यांच्यामागे सावली सारख्या सतत खंबीरपणे उभ्या राहिल्या. अशा महान मातेस व पित्यास माझे कोटी-कोटी प्रणाम..


