रोखठोक
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
हप्तेखोरी हे शासकीय व प्रशासकीय यंत्रणेला लागलेला कलंक आहे.हा कलंक हप्तेखोर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उत्तम,निष्पक्ष आणि योग्य कर्तव्य पार पाडू देत नाही.यामुळे हप्तेखोरी कर्तव्यासह जबाबदारीचा खून करतोय असे दिसून येत आहे.
चिमूर तालुक्यात सट्टा,जुगार व देशी दारुचे अवैध धंदे बिनधास्त सुरू असताना,चिमूर व भिसी पोलिस या धंद्याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.नव्हे तर अवैध धंदे करणेवाल्या इसमांना साथ देत आहेत.ते त्यांचे पडद्यामागचे मित्र झाले आहेत.
यामुळे पोलिसांच्या कर्तव्याचा प्रकार हा बेजबाबदार पणाचा असून ते हप्तेखोर असल्यानेच अवैध धंद्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात,असे चिमूर तालुकातंर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे मन बनले आहे.
तद्वतच अवैध धंद्यातंर्गत हप्तेखोरीमुळे स्थानिक पोलिसांनी जनतेच्या संरक्षणाचे कर्तव्य गुंडाळून ठेवली आहेत असे दिसून येते आहे.
याचबरोबर स्थानिक पोलिसांनी अवैध धंद्याकडे जाणिवपूर्वक केलेले दुर्लक्ष हा राजकीय दबाचा प्रकार आहे काय? हा प्रश्न पडतो आहे..
पोलिस हे जनसेवक आहेत.त्यांची नियुक्ती जनसेवेसाठीच केली जाते.असे असताना त्यांनी अवैध धंद्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे कारण काय?
पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे अवैध धंदे वाले एवढे शिरजोर झाले आहेत की ते सर्व सामान्य नागरिकांचा अपशब्दात अपमान करताना दिसतात.
अवैध धंदावाईकांची मुजोरी हे समाज मनावर आघात करणारी आहे.त्यांच्या मुजोर स्वभावामुळे आणि त्यांच्या अवैध धंद्यामुळे सामाजिक सुसंस्कृतपणा लोप पावत आहे.
चिमूर तालुक्यातील स्थानिक पोलीस अवैध धंद्याकडे लक्ष देत नसल्याने ते बेजबाबदार आणि कर्तव्यहिन आहेत? असे नागरिकांनी म्हणावे काय?
चिमूर तालुक्यातील सर्व अवैध धंद्याची इत्यंभूत माहिती चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ते चिमूर तालुक्यातील अवैध धंद्यांकडे विशेष लक्ष ठेवून असल्याने,चिमूर एसडिपीओ,चिमूर व भिसी ठाणेदार यांच्या कर्तव्याकडेही बारीक लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळाली आहे..



