उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूरचे विभागीय आयुक्त सत्ताधारी भाजपाचे हस्तक आहेत,तर काँग्रेसच्या नगरसेवकांवर जाणूनबुजून अन्याय करत आहे,असा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारानी राज्यातील सत्ताधारी भाजपावर आरोप केला आहे.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या गट नोंदणी संदर्भात कायदेशीर अडचणी आणल्या जात आहेत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी भाजपावर केला आहे.
चंद्रपूर काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार गटातील विजयी नगरसेवकांचे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र हरवल्याची माहिती समोर उघडकीस आली आहे.
चंद्रपूर काँग्रेसमधील विजय वडेट्टीवारगटातील विजयी नगरसेवकांच्या नोंदणीसंदर्भात अन्याय होत आहे.
या संदर्भात काँग्रेसच्या 14 नगरसेवकांनी चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देत त्यांचे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले ओरिजनल प्रमाणपत्र हरवल्याची तक्रार दिली होती.
त्यानंतर काल आमदार विजय वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी त्यांचा गट नोंदवण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रक्रिया सुरू केली.
माहितीप्रमाणे 14 पैकी सुमारे 8 नगरसेवकांनी ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र विभागीय आयुक्त कार्यालयात दिले आहे.मात्र अजूनही 6 नगरसेवकांचे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र गट नोंदणीच्या अर्जामध्ये नाही.त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार गटाच्या गट नोंदणी प्रक्रियेत वेळ होत आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्त कारण नसताना,कोणतेही नियम नसतानाही नगरसेवक विजयी झाल्याचे प्रमाणपत्र मागून नगरसेवकांवर अन्याय करत आहेत,त्यांना मतदानापासून बाद करण्याचे षडयंत्र करत आहेत.आता गट नोंदणी प्रक्रियेत एक वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेतली.तेव्हा त्यांच्यासोबत आलेले वडेट्टीवार गटाचे प्रस्तावित गट नेते सचिन कत्याल यांनी ज्या 6 नगरसेवकांचे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केले नव्हते.त्या सर्व 6 नगरसेवकांचे विजयी प्रमाणपत्राची डुप्लिकेट कॉपी,तसेच प्रमाणपत्र हरवल्या विषयी चंद्रपूरच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची कॉपी विभागीय आयुक्त कार्यालयात दिली आहे.
आमदार विजय वडेट्टीवार गटातील सर्व 19 नगरसेवकांच्या कागदपत्रांची पूर्तता विभागीय आयुक्त कार्यालयात झाली आहे.
काँग्रेसच्या दोन गटांनी त्यांच्या गट नोंदणीचा अर्ज विभागीय आयुक्तांसमोर दिला आहे आणि दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात आक्षेप नोंदवले आहे.त्यामुळे एकाच पक्षाचे दोन गट नियमानुसार नोंदवता येत नसल्यामुळे काँग्रेसची गट नोंदणी करायची की नाही? काँग्रेसच्या दोन्ही गटांचे अर्ज स्वीकारायचे की फेटाळायचे? याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत विभागीय आयुक्त करणार आहे.
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या गट नोंदणीच्या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहे.काल 2 फेब्रुवारी वडेट्टीवार गटातील काँग्रेसच्या 18 आणि बसपाचा 1 अशा 19 नगरसेवकांनी त्यांचा गट नोंदवण्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता.
मात्र,काल काही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे गट नोंदणी होऊ शकली नाही.आज वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत.आयुक्त सत्ताधारी भाजपा सरकारचे हस्तक म्हणून वागत आहेत. जाणून-बुजून वेळ वाया घालवून सत्ताधारी भाजपाला मदत करत आहेत,असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे आणि भाजपा सरकारवर ही टीका केली आहे.



