भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था संचालित जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय, धानोरा येथे आयोजित माजी विद्यार्थी व पालक मेळावा हा भूतकाळाच्या आठवणी, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याच्या दिशादर्शनाचा प्रेरणादायी संगम ठरला.
महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापकवर्ग व सध्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थूल होते.तर मंचावर याप्रसंगी माजी विद्यार्थी म्हणून उद्योजक मलिक बुधवानी, प्रवीण येरसलवार , संजय मेश्राम, दिनेश चंदेल, तसेच विद्यार्थी पालक म्हणून दिनेश चंदेल, शेरखान पठाण , उइके, श्रीमती शिंपी, श्रीमती भुरसे, उपस्थित होते.
डॉ.किरमिरे, डॉ.चौहान, डॉ.लांजेवार, डॉ.जांबेवार, डॉ. चुदरी, डॉ.वाघ, डॉ.झाडे,डॉ.मुरकुटे, प्रा.बनसोड, प्रा.वाळके इत्यादी अतिथी मंचावर उपस्थित होते.
सदर माजी विद्यार्थी पालक मेळावा पदवीधर समारंभ संयोजन समिती द्वारा आयोजित करण्यात आलेले होते.माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभव, संघर्ष व यशकथा सांगत सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाने दिलेले संस्कार, शिस्त व शिक्षणामुळेच आज विविध क्षेत्रांत यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पालकांनीही शैक्षणिक गुणवत्ता, संस्कृतीक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत महाविद्यालयाचे कौतुक केले.
“महाविद्यालय, पालक आणि माजी विद्यार्थी यांचा परस्पर समन्वय हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उदय थूल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थी व महाविद्यालयातील नाते अधिक दृढ झाले असून, भविष्यात शैक्षणिक, सामाजिक व करिअर मार्गदर्शनासाठी संयुक्त उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी बीए बीएससी व एम ए चे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यात आले याप्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले नियुक्त झालेले विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.



