भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील रांगी ते बेलगाव या सहा किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, वाहनधारकांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरत असताना रस्त्यावरील फक्त अर्धे डांबरीकरण उखडलेले खड्डे बुजविले,मागील वर्षी सुद्धा असेच काही खड्याचे डांबरीकरण खड्डे बुजविल्याने मार्ग अधिक खडतर बनला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आजही जशाच्या तशाच असल्याने हा मार्ग पुन्हा धोकादायक ठरत आहे.
तरी नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी लोकांनी केलि आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाने मागिल वर्षी याच रस्त्याची डागडुजी केली आणि पुन्हा या महत्त्वाच्या मार्गावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी पुन्हा एकदा ‘थातूरमांतूर’ डागडुजी करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

रांगी ते बेलगाव हा मार्ग गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणारा मुख्य दुवा आहे.जिल्हा कार्यालय, रुग्णालय, बँका आणि महाविद्यालयांत जाण्यासाठी रांगी, खेळी,मोहलि, कन्हाळगाव,चिंगलि,महावाडा, वानरचुवा,पिसेवडधा,मानापुर, देलनवाडी,नरचुलि,मोहलि इत्यादी गावांसह परिसरातील कुरखेडा, सोनसरी देलनवाडी येथील नागरिक याच मार्गाचा वापर करतात.
मात्र, दत्त मंदिर ते मोटोरोला फाटा दरम्यान रस्ता अर्धा खचला असून, मोरीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. या धोकादायक स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
रस्ता खराब असल्यामुळे अवघ्या सहा किमी अंतरासाठी प्रवाशांचा बराच वेळ वाया जात आहे.त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देवून रस्ता डागडुजी न करता नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



