शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर येथे दिनांक 30 जानेवारी 2026 ला महात्मा गांधी पुण्यतिथी व स्वातंत्र लढ्यातील शूरवीरांना “हुतात्मा दिन” निमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्या,डॉ. सुनंदा आस्वले यांच्या द्वारा पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी सकाळी ठीक ११.००वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून “हुतात्मा दिना” निमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.संदीप सातव,प्रा.डॉ.हुमेशवर आनंदे,प्रा.संदीप मेश्राम,प्रा.डॉ.वरदा खटी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन प्रा.डॉ.सुमेध वावरे,समन्वयक,सांस्कृतिक विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.बिजनकुमार शील यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



