Home कृषी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील नवीन हरभरा शेतमालाची आवक सुरू…

दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील नवीन हरभरा शेतमालाची आवक सुरू…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे रब्बी हंगामातील नविन शेतमालाची आवक सुरू झाली असून हरभरा शेतमालाची यशस्वी विक्री पार पडली.

        पळसोडा येथिल शेतकरी संतोष पाटील ढोकने यांचा हरभरा शेतमाल सुरज जाजू यांच्या अडतीत विक्रीस आला असता खरेदीदार अनिस ऍग्रो यांनी 6011 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला.

           शेतकरी सुभाष पाटील हरणे यांचा हरभरा अनंत पाटील बरवट यांच्या अडतीत विक्रीस आला असता खरेदीदार अनिस ऍग्रो यांनी 6511 रुपये दराने खरेदी केला.

          शेतकरी माधवराव हरणे यांचा हरभरा शेतमाल सोयब ट्रेडर्स यांच्या अडतीत विक्रीस आला असता खरेदीदार अनिस ऍग्रो यांनी 6511 रुपये दराने खरेदी केला.

          रब्बी हंगामातील नविन शेतमालाच्या खरेदीच्या शुभारंभानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील गावंडे यांनी संबंधित शेतकरी, अडते व खरेदीदार यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व नविन हंगामातील खरेदीस शुभेच्छा दिल्या.

          यावेळी बाजार समितीचे संचालक राजेश शेठ राठी, संचालक प्रभाकर पाटील तराळ, संचालक असिफ भाई खान, अनंत पाटील बरवट, प्रदीप बाप्पू देशमुख, अनिस शेठ, गुणवंत पाटील गावंडे, उमाकांत डालके, आदी मान्यवर उपस्थित होते.