Home Social गावातील महिला ह्याच विकासाच्या खऱ्या सूत्रधार:-सरपंच अरविंद राऊत… — ग्रामपंचायत चिचाळा...

गावातील महिला ह्याच विकासाच्या खऱ्या सूत्रधार:-सरपंच अरविंद राऊत… — ग्रामपंचायत चिचाळा (शास्त्री) येथे महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न… — नवनियुक्त नगरसेवक हर्षल डुकरे यांचा सत्कार…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

           गावाच्या विकासात महिलांचा मोठा वाटा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे महिलांच्याच हाती असते त्यामुळे गावाच्या विकासासाठी महिला ह्याच मुख्य सूत्रधार असतात असे सरपंच अरविंद राऊत यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना म्हटले दिनांक १७ जानेवारी रोज शनिवार ला ग्रामपंचायत चिचाळा (शास्त्री)येथे महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.

           या कार्यकामाच्या निमतीत्ताने भिसी नगर पंचायत येथील निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्धल नगरसेवक हर्षल घनश्याम डुकरे यांचा सत्कार करण्यात आला.

               या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले चिमूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी नितीन फुलझेले तसेच भिसी आंबोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या माजी सदस्या सौ ममता घनश्याम डुकरे यांनी मार्गदर्शन केले.

            यावेळी प्रमुख पाहुणे म्हूणन प्रगती महिला ग्रामसंघ सिआरपी सौ.वैशाली दुर्गे, माहीम महिला गटांच्या सौ जोत्सना खोब्रागडे, सौ.सुषमा डुकरे, ग्रामपंचायत सदस्या जोत्स्ना वासनिक, सौ.सुकेशनी रामटेके,सौ. मनीषा दडमल, श्रीमती प्रभा रामटेके,उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोजगार सेवक प्रशांत सुखदेवे तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी श्री पोडे यांनी केले असून या कार्यक्रमासाठी संगणक परिचालक नविन्द्र वासनिक परिचर संजय सुखदेवे यांनी परिश्रम घेतले.