Home Social गो संवर्धनाचे महत्व,उदिष्ट,आणि त्यांच्यावरील प्रेमाचा योग्य भाव बघता गजानन गुळधे यांनी गाय...

गो संवर्धनाचे महत्व,उदिष्ट,आणि त्यांच्यावरील प्रेमाचा योग्य भाव बघता गजानन गुळधे यांनी गाय व वासरू घेतले दत्तक…

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

    शुभम गजभिये 

      विशेष प्रतिनिधी 

             बदलत्या काळात पाळीव प्राणी संवर्धन करणे कठीण होत चालले असून अनेकांनी पाळीव प्राणी पाळणे बंद केले.मात्र,गायीवरील प्रेम आणि भविष्यात गो संवर्धन टिकून राहण्यासाठी आदर्श सातारा गावचे सरपंच गजानन गुळधे यांनी गोंदेडा गो शाला मधून गाय व वासरू दतक घेतली.

            पूर्वी गोमातेला धार्मिक महत्व होते.शेतकऱ्यांची घरी पाळीव प्राणी मधील गाय पाळल्याची जात होती.गाई पासून बैलाची उत्पती होऊन बैल शेती वापर साठी मौल्यवान होता. 

              परंतु आधुनिक विज्ञानाच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानातून ट्रॅक्टर ची निर्मिती होऊन यंत्रा च्या सहाय्याने शेती ची मशागत होत आहे.जंगली हिस्त्र प्राण्यांमुळे गाय,बैलांची शिकार होत आहे.शेतकरी संकटात सापडत आहे.

            पाळीव प्राणी मधील गाय,बैल लोप पावत आहे.गायीचे सवंर्धन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

          आदर्श सातारा ग्रामपंचायत सरपंच गजानन गुळधे हे युवा शेतकरी असून राजकारण सोबत प्रामुख्याने शेती व्यवसाय करीत असतात.वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गोशाला ला भेट दिली.सोबत गो शाला अध्यक्ष कमल असावा,रमेश कंचर्लावार सुद्धा उपस्थित होते.तेथील शेकडो गाई,वासरू बघून प्रेमाने हात कुरवाळून ते भारावून झाले. 

            आधुनिक काळात गो संवर्धन करणे काळाची गरज बघून सरपंच गजानन गुळधे यांनी एक गाय व वासरू दत्तक घेण्याचा निर्णय घेत दत्तक घेऊन आपल्या सातारा गावाला घेऊन गेले.