रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर येथील प्राचीन घोडा यात्रा निमित्त आमदार बंटीभाऊ भांगडिया व चिमूर घोडा यात्रा महोत्सव समितीच्या वतीने,”उत्सव कलावंताचा.. महोत्सव चिमूरकरांचा,भव्य घोडा यात्रा महोत्सव २०२६ दिनांक २ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.
या महोत्सवात विविध सेलिब्रिटी उपस्थित राहून मनोरंजन करणार आहे.सदर महोत्सव कार्यक्रम चिमूर फ़ॉरेस्ट ऑफिस च्या मैदानावर होणार आहे.
महोत्सवात दिनांक २ फेब्रुवारी ला गायिका पलक मुछल दिनांक ३ फेब्रुवारीला, गायिका मैथिली ठाकूर दिनांक ४ फेब्रुवारीला,गायक संगीतकार आदित्य नारायण तर दिनांक ५ फेब्रुवारीला डान्स कॉम्पिटिशन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी सर्व संगीत व इतर कार्यक्रमाऋआ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चिमूर घोडा यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.



