शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
ग्रामगीता महाविद्यालयात दिनांक 12 जानेवारी 2026 रोज सोमवारला उपजिल्हा रुग्णालय चिमूर,तसेच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त वतीने स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच ‘राष्ट्रीय युवा दिन’ आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्य साधून एच.आय.व्ही एड्स जनजागृती शपथ,मार्गदर्शन आणि रॅली आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महाविद्यालयाची प्राचार्या डॉ.सुनंदा आस्वले,अतिथी आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपजिल्हा रुग्णालय,चिमूर येथून कु. कामिनी हलमारे (आयसीटीसी समुपदेशक),श्री.सुमेध साखरे (आयसीटीसी समुपदेशक),श्री. माधव बंडेबुचे (आयसीटीसी लिंक वर्कर),आणि श्री.महाबळे (ब्लड बँक अधिकारी) तसेच मंचावर डॉ. निलेश ठवकर,रेड रिबन क्लब समन्वयक,डॉ. बिजनकुमार शिल,रासेयो समन्वयक,डॉ.संदीप सातव,डॉ. हुमेश्वर आनंदे,डॉ.मृणाल वऱ्हाडे,आणि प्रा.विवेक माणिक उपस्थित होते.
प्राचार्या डॉ.सुनंदा आस्वले यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती देत असताना विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवन,कार्य आणि विचारांना आदर्श ठेवून जीवनात पुढे गेले पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स बद्दल माहिती दिली तसेच एचआयव्ही रुग्णांसोबत भेदभाव न करता त्यांच्यासोबत प्रेमाने वागावे असे संदेश दिले. मार्गदर्शनाच्या कार्यक्रम संपल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत ‘नैतिकता पाळा- एड्स टाळा’ आणि ‘युवा दिन चिरायू हो’ या उद्घोषाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



