Home Social बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्त संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार संजीव भांबोरे...

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्त संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार संजीव भांबोरे यांचा सत्कार…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

भंडारा – येथील एचडी महाविद्यालयात संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भंडारा जिल्हा संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे ,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

          यावेळी डॉ. बाळकृष्ण सार्वे ,अमृत बनसोड ,संजय मते ,हिवराज उके, आसित बागडे, वामनराव गोंधुळे ,अजबराव चिचामे,डॉ.सुरेश खोब्रागडे, डॉ रवींद्र जनबंधू ,ज्ञानचंद जांभुळकर, दिलीप वानखेडे ,राजेश मडामे, प्रभाताई पेंदाम गोंडवाना गणतंत्र संघटना,मनीषा भांडारकर, व असंख्य कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.