Home Social गुडमॉर्निंग ग्रुप साकोली तर्फे पत्रकार दिन साजरा…

गुडमॉर्निंग ग्रुप साकोली तर्फे पत्रकार दिन साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

  गुड मॉर्निंग ग्रुप साकोली तर्फे करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डी इ रामटेके सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार व त्या सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी सर , डॉ जितेंद्र कुमार ठाकूर इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. 

        सर्वप्रथम जेष्ठ पत्रकार डी जी रंगारी सर यांना पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिनि त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार डी जी रंगारी सर यांनी सन 2000 पासून 25 वर्षे पत्रकार क्षेत्रातील अनुभव विशद केले तसेच पत्रकावर होणारा अन्याय अत्याचार प्रथम च्या व त्या काळातली पत्रकारिता त्याला कसं समोर जावं लागत होते व आजची पत्रकारिता याविषयी विविध मार्गदर्शन केले.

        याप्रसंगी डॉ जितेंद्रकुमार ठाकूर यांची मार्गदर्शन झाले कार्यक्रम त्यात संचालन व प्रास्ताविक प्राध्यापक मनोहर मस्के यांनी केले तर आभार माजी मुख्याध्यापक नरेश रामटेके यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता माजी मुख्यध्यापक विजय देवकर, श्रीधर खेडीकर, सुभेदार मेजर पुरुषोत्तम मुनेश्वर, डॉ जनार्दन सुखदेवे ,फुलचंद सुखदेवे ,मधुकर नारनवरे, रमेश कापगते, सूर्यभान उपस्थित होते