Home देशविदेश स्वर्ग,मृत्यू, पाताळ आणि मोक्ष…

स्वर्ग,मृत्यू, पाताळ आणि मोक्ष…

          स्वर्ग मृत्यु पाताळ आणि मोक्ष ह्या संकल्पना मानवनिर्मित संकल्पना आहेत. पारलौकिक धर्मात याची चर्चा आहे, कारण की धर्म म्हणजे वैदिक ब्राह्मण धर्माने या संकल्पना ना मान्यता दिलेली आहे.ऐहिक धर्मांनी या संकल्पना अमान्य केल्या आहेत. ज्योतिबा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, बसवेश्वर यांचा लिंगायत धर्म, चक्रधर स्वामीचा महानुभाव पंथ, आ. ह.साळुंखेचा शिवधर्म,संतांचा वारकरी संप्रदाय,गुरूगोविंदशिंग यांचा शिखधर्म,गौतमबुद्धाचा बौद्धधर्म ( बाबासाहेबांनी यास धम्म म्हटले ). असे काही धर्म आणि पंथ आहेत ,जे ऐहिक धर्म म्हणून प्रचलित आहेत.हे धर्म कर्मकांडाला अधिक महत्त्व न देता सेवेला महत्त्व देतात.सेवा हाच धर्म असे मानतात. स्वर्ग मृत्यू पाताळ मोक्ष या गोष्टी काल्पनिक असून पारलौकिक धर्माच्या गोष्टी आहेत.संसार हा भ्रम आहे,खोटा आहे,असत्य आहे, जग हे खोटे आहे,म्हणून या जगात संसारात रमता कामा नये,संसार दुखमय आहे.खरे सुख स्वर्गात आहे,स्वर्गसुख मिळण्यासाठी मानविजन्मात पुण्य च पुण्य म्हणजे पुण्या च्या राशी केल्या पाहिजेत.पुण्य केले तर परत मानवी जन्म मिळतो,म्हणजे ज्यात जन्म मरण आहे अशा मृत्यू लोकात जन्म होतो,आणि मानवी जन्मात अधिक पाप झाले तर त्याला नरकात म्हणजे पाताळात जावे लागते.आणि पापही नाही केले,आणि पुण्य ही नाही केले,म्हणजे पापपुण्य च्या भानगडीत नाही पडले तर मोक्ष मिळतो.म्हणजे स्वर्ग पेक्षाही अती महत्वाचे ठिकाण किंवा अवस्था म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे सुख नको आणि दुःखही नको,सुखदुःखा पलीकडचा विचार ,अवस्था म्हणजे मोक्ष होय.

     ऐहिक धर्म मानणारे लोक स्वर्ग मृत्यु पाताळ या संकल्पनांना मान्यता देत नाहीत.त्या अंधश्रद्धा आहेत,असत्य ,निराधार,अशास्त्रीय आहेत,त्या पारलौकिक संकल्पना आहेत,ऐहिक आणि व्यवहारिक नाहीत म्हणून त्या मानू नयेत,असे धर्म मानणारे पण ऐहिक धर्म मानणारे यांची समज आहे.

      ऐहिक धर्म म्हणजे इहलोकिक धर्म,म्हणजे आकाशातील म्हणजे वरचा धर्म नव्हे,तर पृथ्वीवरचा,जमिनीवरचा,व्यवहारिक धर्म होय,पण या ऐहिक धर्माची गंमत अशी की,यातील काही ईश्वर मानतात,आणि मोक्ष ही संकल्पना पण मानतात,परंतु दोन्हीतील फरक हा की,हे ऐहिक धर्मवाले आत्मा म्हणजेच ईश्वर असून तो प्रत्येक जिवात आहे,प्रत्येकाच्या शरीरात आहे,असे मानतात,याचा अर्थ आत्मा तोच परमात्मा,तोच ईश्वर होय,म्हणून आत्म्याची सेवा हीच ईश्वर सेवा,म्हणजेच,जनसेवा हीच ईश्वरसेवा समजावी.तसेच जनसेवेच्या माध्यमातून जनतेचे सर्व भौतिक समस्या सुटतात,असा यांचा विश्वास असतो.याचा अर्थ मानवी भौतिक आणि मानसिक समस्याचे कारण मोक्षात आहे.मोक्ष हा समस्येवर उपाय आहे,आणि मोक्षासाठी नैतिकता,नीतिमत्ता पाळणे आवश्यक आहे,आणि तीही आदर्श नीतिमत्ता ( म्हणजे व्यावहारिक नव्हे तर काल्पनिक नीतिमत्ता ) पाळली तरच मोक्ष प्राप्ती आहे,असे हे ऐहिक धर्मवाले यांचे तत्वद्न्यान आहे.यात विकृती आणि संस्कृतीचा बराच अभ्यास आहे.अहंकार,मोह माया राग द्वेष मत्सर कपट अभिमान मान इत्यादी हे दुर्गुण आहेत,हे माणसाचे शत्रू आहेत,यांचा त्याग करणे म्हणजेच मोक्ष होय,आणि या दुर्गुणांची जोपासना करणे म्हणजेच पाप होय.ते अनैतिक होय.अशी मान्यता आहे,हे दुर्गुण चांगल्या संस्काराने नष्ट होतात,यावर पण यांचा विश्वास असतो.वाईट संस्काराने माणूस दुर्गुणी होतो असे हे मानतात.

       आत्म्यावरील दुर्गुणांचे थर काढून टाकले की शुद्धात्मा दिसेल,असे ते म्हणतात.शुद्धात्मा म्हणजेच परमेश्वर असेही हे मानतात.

        भौतिकवादी तत्वद्न्यान हे पारलौकिक धर्माचे आणि ऐहिक धर्माचे तत्वद्न्यान मान्य करीत नाहीत,या दोन्ही तत्वद्न्यापेक्षा भौतिक तत्वद्न्यान अलग आहे.ते म्हणजे असे की,पुण्य आणि पाप या काल्पनिक गोष्टी आहेत, तो एक स्वप्नकूपणा आहे.ईश्वर हे एक माणसाचे अज्ञान आहे. धर्म ही एक संकल्पना असून त्यास मान्यता दिल्या गेलेली आहे. धर्म म्हणजे धारणा, धारणा म्हणजे मान्यता मान्यता म्हणजे विश्वास श्रद्धा भक्ती. या कल्पना अंधश्रद्धा जरी नसल्या तरी या निमित्ताने केलेले कर्मकांड मात्र अंधश्रद्धाच आहे,असे भौतिक तत्वद्न्यान सांगते.

      ज्या विचारात विज्ञान नाही तर्क नाही प्रयोग नाही अनुभव नाही इतिहास नाही, समाजशास्त्र नाही अर्थशास्त्र नाही, मानसशास्त्र नाही, म्हणजेच ज्या विचारात अज्ञान आहे जे विचार अशास्त्रीय आहेत, जे विचार वैज्ञानिक नाहीत किंवा जे विचार तर्कहीन आहेत,ते विचार सत्य नसतात,किंवा चुकीचे असतात,असे भौतिक तत्वद्न्यान म्हणते.

       माझ्या मते पुण्य कर्म म्हणजे धर्म नव्हे आणि सेवा करणे म्हणजे धर्म नव्हे, आत्मज्ञान म्हणजे धर्म नव्हे आणि ईश्वर ज्ञान आणि त्याची पूजा म्हणजे पण धर्म नव्हे, तर कर्तव्य म्हणजेच धर्म होय. कर्तव्य याचा अर्थ केलेच पाहिजे असे काम, असे काम की जे नाही केल्याने माणसाचे बरेच काही नुकसान होत असते. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे काम शेती करणे मजुराचे काम मजुरी करणे शिक्षकाचे काम शिक्षण देणे संशोधकाचे काम संशोधन करणे, नेत्यांचे काम नेतृत्व करणे, अधिकाऱ्यांचे काम प्रशासन चालवणे, कर्मचाऱ्यांचे काम आपले कर्तव्य पार पाडणे, व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित व्यवस्थापन करणे आणि कारखान्यातील मजुरांचे काम कामगारांचे काम प्रामाणिकपणे आपले काम करणे, याचा अर्थ कर्तव्य असे होय, आपले काम प्रामाणिकपणे करणे म्हणजेच कर्तव्य होय, मी जे काम करतो ते केवळ पैसे मिळतात म्हणून काम करतो असे नाही तर समाजासाठी आणि देशासाठी काम करतो आहे अशी भावना अशी श्रद्धा असा विश्वास ठेवून कर्तव्य करणे किंवा आपले काम करणे, आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी पार पाडणे म्हणजेच कर्तव्य होय, हे कर्तव्य म्हणजेच धर्म होय, यापेक्षा दुसरा कोणताही धर्म नाही.

       आता राहिला प्रश्न पाप पुण्याचा आणि नैतिक अनैतिकतेचा, नैतिकता म्हणजेच पुण्य आणि अनैतिकता म्हणजेच पाप. या गोष्टी म्हणजे समाजधारणा होत, समाजच आपले जीवन सुखकर होण्यासाठी काही नियम तयार करीत असतो, असे सामाजिक नियम म्हणजेच पाप पुण्य किंवा नैतिकता आणि अनैतिकता होय. या समाज मान्यता असते, परंतु ही समाज मान्यता जर ताठर असेल किंवा परिस्थितीनुसार बदलणार नसेल तेव्हा मात्र समाजात अनेक समस्या निर्माण होतात, आणि त्या हिंसा घडवीत असतात,

          मानवी विचाराचा आणि मनाचा एक गुणधर्म असतो तो म्हणजे पाण्याचा गुणधर्म, पाण्याचा गुणधर्म म्हणजे प्रवाही असणे होय, पाण्याच्या प्रवाहाला जर आडविले तर पाणी एक तर दूषित होईल, दुर्गंधी होईल, तिने रुपये होईल, म्हणून पाण्याला अडवायचं नसते आणि जरी अडविल तरी त्याला आउटलेट ठेवायचे असतात की ज्यामुळे पाणी प्रवाही राहील. बांध तळे आणि धरणे यांना आउटलेट असतात तसेच विचाराला मनाला धर्माचे किंवा नीतिमत्तेचे किंवा नैतिकतेचे किंवा पाप पुण्याचे जरी बांध घातले तरी त्याला आउटलेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, विचाराचे आणि मनाचे आउटलेट म्हणजे मनाला विचाराला वाट करून देणे, त्यांना प्रवाही ठेवणे, असे नाही केल्यास जसा बांध फुटतो तसा पण मनाचा आणि विचाराचा बांध फुटतो, मनाचे आणि विचाराचे भूकंप धरनिकणीकंप झाले की विस्फोट ज्वालामुखी होणारच.त्यातून मानवीजीवन अस्ताव्यस्त होणारच.

        तसा विचार केला तर धर्म म्हणजे एक प्रकारचे बंधन किंवा बांधच असतात, कार मारुतींनी तर धर्माला अफूची गोळी म्हटलेले आहे, माणसाला धर्माची नशा चढते आणि त्यातून तो अनेक चुका करत असतो. म्हणून धर्म हे पारंपारिक बनता कामा नये, धर्म हा रूढी बनता कामा नये.बांध बनता कामा नये. तो पण प्रवाही आणि लवचिक असला पाहिजे. अन्यथा धर्म ही संकल्पनाच माणसाच्या विचारातून बाद होईल.

       पारंपरिक रूढीप्रिय आणि धार्मिक बंधनातून माणसाला मोक्ष मिळणार नाही. मोक्ष म्हणजे सुटका. मोक्ष म्हणजे सुख शांती समाधान आणि आनंद. या गोष्टी विचार केल्याने मिळतात विचार थांबविल्याने नाही. विचार प्रवाह विचार परिवर्तन विचार क्रांती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण काळ वेळ परिस्थिती ही बदलत असते, त्यानुसार माणसाचे विचारही पण बदलत असतात आणि संस्कारही बदलत असतात, हे सत्य आणि ही वास्तविकता जर आपण लक्षात घेतली तर मग पाप पुण्य नैतिकता वगैरे गोष्टी दुय्यम ठरतात,

         आपल्यामुळे कोणास त्रास होणार नाही अशा प्रकारचे आपले बोलणे आणि वर्तन म्हणजेच नैतिकता आणि पुण्य होय, फक्त एवढीच संकल्पना आणि या संकल्पनेवर आपली श्रद्धा असली म्हणजे बस झाले, बाकी साऱ्या गोष्टी गौण समजाव्यात. याच विचारात खरा मोक्ष आहे.

        लेखक : दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

                  फोन : 9420912209.