विषमतेचे दोन प्रकार 1आर्थिक विषमता 2 सामाजिक विषमता.
आर्थिक विषमता म्हणजे वर्गीय व्यवस्था,आर्थिक स्तर असलेली व्यवस्था.विविध उत्पन्न गट असलेला समाज.आर्थिक विषमतेची व्यवस्था म्हणजे जमीनदारी आणि भांडवलदारी आणि भांडवलशाही व्यवस्था.
समाजात अशी व्यवस्था निर्माण होण्याचे कारण म्हणजे आर्थिक शोषण हे होय.अधिकाधिक नफा कमावणे,श्रमिकांना कमी वेतन देणे,त्यांना नफ्यात वाटा न देणे,समाजास घातक असे धंदे करणे उदा. नसेले पदार्थ म्हणजे दारू गांजा चरस तंबाखूजन्य वस्तू निर्मिती करणे,ते विकणे त्यातून भरमसाठ पैसा कमावणे,अवैध वाहतूक, लाच लुचपत,भ्रष्टाचार, धोक्याने एखाद्याची प्रॉपर्टी घेणे,खोटे बोलून,चोऱ्या मारामाऱ्या करून,दादागिरी,गुंडगिरी करून,राजकीय पक्षात प्रवेश करून सत्तेत जाऊन जनतेची तिजोरी लुटणे ,हिंसा करून इत्यादी चुकीच्या अन्यायी मार्गाने पैसा धन संपती कमाई करून धूर्त स्वार्थी लोक श्रीमंत होतात.समाजात श्रीमंतवर्ग निर्माण होतो.
भरमसाठ पगार घेणाऱ्याचा,व्यापाऱ्यांचा मध्यमवर्ग असतो.आणि क्लास थ्री आणि क्लास फोर आणि श्रमिकांचा गरीब वर्ग असतो.
महागाई ,बेकारी , अन्याय ,अत्याचार हे आर्थिक विषमता असल्यामुळे ,यातील शोषणामुळे होत असतात.आर्थिक शोषणावर आधारित सामाजिक व्यवस्था म्हणजेच आर्थिक विषमता होय.या व्यवस्थेत गरीब हा अधिकच गरीब होत जातो,आणि श्रीमंत हा अधिकच श्रीमंत होत जातो.हे या व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.
2.सामाजिक विषमता
वर्णव्यवस्था, रंगभेद,जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता ,उच्चनीचता, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव असलेली समाजव्यवस्था म्हणजेच सामाजिक विषमता होय.
भारतीय सामाजिक विषमतेचे वैशिष्ट्य हे की,येथील जातीव्यवस्था ही उतरंड व्यवस्था आहे.म्हणजे जातींची रांग ही समांतर नाही,तर वरखाली अशी आहे.
या जाती व्यवस्थेचे दुसरे वैशिष्ट्ये हे की,वरची जात खालच्या जातीला कनिष्ठ आणि आपल्या वरच्या जातीला आपल्यापेक्षा वरिष्ठ मानते.म्हणजे अशी मान्यता आहे.म्हणून वरच्या जातीला आपण वरिष्ठ असल्याचा अभिमान गर्व असतो.आणि खालच्या जातीला पण आपल्या जातीचा वरिष्ठपणाचा गर्व असतो,त्याचे कारण म्हणजे त्या जाती खाली दुसरी एक जात असते.याचा अर्थ प्रत्येक माणसाला आपली जात वरिष्ठ असल्याचा गर्व आणि कनिष्ठ असल्याचे दुःख असते,जे अपमानात्मक वाटते.
जातिव्यवस्थेचे अजून एक वैशिष्ट्ये हे की,जातीयता कायम टिकावी म्हणून आंतरजातीय विवाहास बंदी घातली आहे,जातीजातीतच लग्न लागले पाहिजे,म्हणजे मुलगा मुलगी एकाच जातीची असणे बंधनकारक आहे. हे बंधन तोडणाऱ्यास जातीबाहेर काढल्या जाते,कोणत्याही जातीत घेतल्या जात नाही,यास बहिष्कार टाकणं असे म्हटले आहे.
जातीविषमतेचे अजून एक दुष्परिणाम म्हणजे वर्णव्यवस्थेनुसार ब्राम्हण क्षत्रिय वैश्य या सवर्ण जाती ज्या एकूण 15 टक्के आहेत,यांना प्रत्येक क्षेत्रात संधी आणि दर्जा असेल आणि बाकी 85 टक्के जाती म्हणजे ओ बी सी, ए सी,एस टी,अल्पसंख्याक,धर्मांतरित जातीना संपती कमावणे,ती बाळगणे,शिक्षण घेणे , धार्मिकविधी करणे नाकारण्यात आले.म्हणजे समान संधी आणि दर्जा या बहुजन जातीस नाकारण्यात आला.अशा प्रकारची विषमतेवर आधारित समाजव्यवस्था आर्य ब्राह्मणाच्या अधिपत्याखाली हजारो वर्ष राबविण्यात आली.या व्यवस्थेची राज्यघटना म्हणजे संविधान म्हणजेच कायदे राबविण्यात आले.
बाबासाहेबांनी विषमतेवर आधारित आणि अन्यायकारी ही मनु स्मृती जाळली आणि तिला पर्याय दिला सामाजिक समतेवर आधारित भारतीय राज्यघटनेचा.कायद्यापुढे सर्व समान,सर्वांना मतदानाचा अधिकार,सार्वजतीधर्माच्या लोकांना समान संधी आणि दर्जा अशाप्रकारचे संविधान निर्माण करून 85 टक्के मागासलेल्या समाजास न्याय दिला.आरक्षणाद्वारे समान संधी दिली,मागास जातींची विशेष सवलती देऊन पुढारलेल्या जातीबरोबर आणण्याचा कायदा केला.
जात धर्म वंश प्रांत लिंग यात भेद करणारे कायदे मोडीत काढून कायदा सर्वासाठी सारखाच ,कायद्यापुढे सारे समान असा कायदा केला आणि उच्चनीचता भेदभाव मिटविला.
कायदा जरी समतेचा असला तरी व्यवहारात समता अजूनही आली नाही,अजूनही आंतरजातीय विवाहास विरोध होतोच.जाती धर्माचे प्रस्त आहेच.याचे कारण सरकार .कारण सरकार कायद्याची अंमलबजावणी करत नाही.कारण मंत्रिमंडळ हे जातीवादी धर्मवादी असते.
सामाजिक समता प्रस्थापित न होण्याचे कारण हे की,भांडवलशाही अर्थव्यवस्था होय.कारण भांडवलशाहित्त साऱ्यांनाच आर्थिक शोषण पिळवणूक करण्याची संधी असते,स्वातंत्र्य असते.
अजून एक कारण ते म्हणजे सत्ता टिकवण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी जात धर्म हे उपयोगी पडतात,म्हणून सत्ताधारी आणि भांडवलदारांना जाती आणि धर्म टिकून राहिले पाहिजेत असेच वाटत असते.मनुवाद ,मनुस्मृती म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विषमता होय.आणि भांडवलवाद आणि भांडवलशाही म्हणजे आर्थिक विषमता होय.समाजवाद म्हणजे सामाजिक समता होय.सर्व संत महात्मे महामानवांचे विचार हे सामाजिक समतेचे आहेत.परंतु आर्थिक विषमतेमुळे ते अमलात येत नाहीत.याचा अर्थ जोपर्यंत आर्थिक समता म्हणजे वर्ग विहीन,वर्गविरहित समाज रचना निर्माण होत नाही,तो पर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होत नाही.तसेच आर्थिक समता आली तरी सामाजिक समता येईलच असे नाही,कारण विषमतेचे विचार,मानसिकता नष्ट झाल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होत नाही.जातीभेद,लिंगभेद,धर्मभेद इत्यादी भेदभावाची भावना आणि विचार नष्ट होणार नाहीत,उच्चनीचतेचे,कनिष्ठवरिष्ठ तेचे विचार संपुष्टात येणार नाहीत,तो पर्यंत कोणत्याही व्यवस्थेत सामाजिक समता नांदणार नाही.आर्थिक समता मात्र अशी एक भौतिक व्यवस्था,परिस्थिती असू शकते की,स्वार्थी आणि भेदभावाचे विचारास संधी मिळणार नाही.हेपण तितकेच महत्त्वाचे आहे.म्हणून सामाजिक समतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आर्थिक समता महत्वाची आहे.



