हिंदू धर्म हा धर्म नसून ती एक भारताची प्राचीन संस्कृती आहे. उत्तर भारतातील सिंधू संस्कृती आणि दक्षिण भारतातील द्रविड संस्कृती या दोन्हीचा मिलाप म्हणजे हिंदू संस्कृती होय. याच प्राचीन भारतीय संस्कृतीला परकीय आर्य ब्राह्मणांनी हिंदू धर्म असे नाव दिले. याचे कारण म्हणजे त्यांना त्यांचा ब्राह्मण धर्म सुरक्षित ठेवायचा होता, म्हणून त्यांनी हिंदू धर्माचा मुखवटा लावला आणि त्यामागून ब्राह्मण धर्माचा आणि त्या धर्माच्या संस्कृतीचा विस्तार केला.
प्राचीन भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक आणि विशाल हृदयाची विशाल मनाची आहे, कारण या संस्कृतीने इतर कोणत्याच धर्माच्या संस्कृतीचा द्वेष न करता किंवा त्यांना विरोध न करता त्यांना बंधू भावाची वागणूक दिली, एवढेच नाही तर त्यांच्या सण वार उत्सव इत्यादी धार्मिक कार्यक्रमात अजूनही सहभागी होत असतात, म्हणूनच प्राचीन भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती ही सर्वसमावेशक आणि व्यापक आणि सहिष्णू आहे. अहिंसा प्रेम दया क्षमा शांती स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व ही प्राचीन भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये किंवा तत्वे किंवा विचार आहेत. इतर धर्मातील चांगले आणि उद्धार जे काही आहे त्याचा स्वीकार करायचा आणि वाईट गोष्टीचा स्वीकार करायचा नाही हे हिंदू संस्कृतीचे धोरण राहिलेले आहे, तसेच आपले जीवन ज्या ज्या गोष्टीवर अवलंबून आहे, निसर्गातील त्या त्या गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करणारी ही संस्कृती आहे, म्हणूनच चंद्र सूर्य वरून गाय बैल साप दीप भूमी अन्नधान्य यांची पूजा करणे आणि त्यांचे सणवार साजरे करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. जसे की नागपंचमी पोळा दीपावली शिमगा वेळ अमावस्या, धरतीला आंबील पुजणे, धान्य राशी म्हणजे खळ्याची पूजा करणे, बैलपोळा, वृक्ष पूजा अशा अनेक गोष्टी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या खुणा आहेत.
2. वैदिक ब्राह्मण धर्म —हा धर्म मात्र संकुचित आणि संकीर्ण विचाराचा आहे, माणसा माणसात भेद करणारा आहे, अस्पृश्यता, उच्चनीचता, वरिष्ठ कनिष्ठ, जातीयता, धर्मांधता या सर्व गोष्टी खचाखच भरलेल्या आहेत. वंश वाद, घराणेशाही, हुकूमशाही, गुलामीची व्यवस्था, यासाठीच हा धर्म कार्य करीत असतो.
हिंदू संस्कृतीचे किंवा हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान हे निसर्गाला धरून आहे किंवा आहे सिद्धांतावर आधारलेले आहे, परंतु वैदिक ब्राह्मण धर्माचे तत्त्वज्ञान हे पारलौकिक आहे, स्वर्ग मृत्यु पाताळ, मोक्ष, आत्मा, ईश्वर, कर्मकांड, अंधश्रद्धा, भविष्य, राक्षस भूत हडळ अशा अनेक काल्पनिक निराधार अवैज्ञानिक व शास्त्रीय गोष्टीचा स्वीकार करणारा हा धर्म असून मानवी हक्क नाकारणे आणि माणसाने माणसाचे शोषण करणे हे ह्या धर्माचे मुख्य अंग आहे किंवा मुख्य धोरण आहे, हेच धोरण या वैदिक ब्राह्मण धर्माने या परकीय धर्माने प्राचीन भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृतीवर लादले, हिंदू धर्म या नावाने, आणि भारत देशाचा सर्वनाश केला.
या धर्मात स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय प्रेम दया क्षमा शांती अहिंसा या कोणत्याच गोष्टी चा समावेश नाही, हा मानवतावादी धर्म नसल्यामुळे तो सर्वसमावेशक नाही व्यापक नाही उलट संकीर्ण संकुचित विचाराचा आणि आचरणाचा हा वैदिक ब्राह्मण धर्म आहे, गॅस आपण हिंदू धर्म असे म्हणण्याची चूक करीत असतो.
3. मुस्लिम धर्म —या धर्मात जाती असल्या तरी अस्पृश्यता नसल्यामुळे या धर्मात माणसा माणसात भेदभाव उच्चनीचता केल्या जात नाही, म्हणून हा धर्म या अर्थाने व्यापक आहे, परंतु या धर्मामध्ये ज्या काही जाती आहेत त्या जातींची आपापसात लग्न होत नाहीत, ही या धर्माची संकीर्णता आहे, हा धर्मपण अल्ला, अल्लाचा संदेश वाहक म्हणजे पैगंबर, आणि अल्लानेच निर्माण केलेले कुराण, आणि ह्या कुराणात जे काही आहे जसे काही आहे तसेच वागले पाहिजे त्यात परिस्थितीनुसार किंवा काळानुसार सुद्धा बदल करू नये यावर अजूनही मुस्लिम समाजाची ठाम निष्ठा असल्यामुळे मुस्लिम धर्म हा व्यापक म्हणता येणार नाही, सर्वसमावेशक असेही म्हणता येणार नाही, कारण मुस्लिम स्त्रिया आणि पुरुष यातील भेद, महिलांची पडदा पद्धत, महिलांना सार्वजनिक ठिकाणी आणि मज्जिद मध्ये परवानगी नाकारणे अशी दुय्यम वागणूक म्हणजे संकीर्णताच होय.
वैदिक ब्राह्मण धर्माप्रमाणेच याही धर्मास आंतरजातीय विवाह मान्य नाही, तसेच इतर धर्मियासोबत मुस्लिम स्त्री पुरुषाला जर लग्न करायचे असेल तर इतर धर्मियांनी आधी मुस्लिम धर्म स्वीकारला पाहिजे अशी या धर्माची अट म्हणजे मानवतेच्या दृष्टीने एक संकुचितच विचार म्हटले पाहिजेत.
बाकी इतर धर्मियासोबत न्यायाची वागणूक, बंधू भावाची वागणूक, समतेची वागणूक, शेजाऱ्या शेजाऱ्याशी प्रेम, मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणाच्याही मदतीला धावून जाणे, इत्यादी गोष्टी किंवा व्यवहार मात्र व्यापक विचारात बसणाऱ्याच आहेत.
3. ख्रिश्चन धर्म —तसा उदारमतवादी धर्म आहे, सर्व समावेशक असा धर्म आहे, हा धर्म इतर धर्मियांचा द्वेष करीत नाही, जातीयता या धर्मात नाही, आंतरजातीय विवाह मोठ्या मनाने मान्यता दिली जाते, म्हणून ख्रिश्चन धर्म हा उदारमतवादी आणि सर्वसमावेशक धर्म आहे असे म्हणायला जागा आहे,
तरी परंतु या धर्मात इतर धर्मियांना प्रार्थना स्थळी परवानगी जरी असली तरी त्यांना देवाचा प्रसाद घेण्यास मात्र मनाई आहे, ही या धर्मातील संकीर्णता किंवा संकुचित विचार आहे असेच म्हणावे लागेल. मुस्लिम धर्माप्रमाणेच या धर्मात पण ईश्वर आणि सैतान तसेच काही अंधश्रद्धा पण पाळल्या जातात, यासाठी काही प्रमाणात हा धर्म पण संकुचितच आहे असेच म्हणावे लागेल.
4. बौद्ध धर्म —स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय अहिंसा प्रेम शांती इत्यादी तत्व किंवा नैतिक गोष्टी या धर्मात असल्यामुळे हा धर्म इतर धर्माच्या तुलनेत अधिकच व्यापक आणि सर्वसमावेशक असा आहे, म्हणून बाबासाहेबांनी हा धर्म स्वीकारला, परंतु या धर्माला धर्म न म्हणता बाबासाहेबांनी धम्म म्हणजे सदविचारी मार्ग असे म्हटले आहे, यामुळे या धर्माची व्यापकता आणि नैतिकता अधिकच विस्तारलेली आहे.
तरीपण जशी ब्राह्मण धर्माची देवळे, मुस्लिम धर्मातील दर्गा आणि मस्त मशिदी, ख्रिश्चन धर्माच्या चर्चेस, याप्रमाणेच बुद्ध धर्मा चे बुद्ध विहार यात साम्यच आहे, ही सारी त्या त्या धर्माची प्रार्थना स्थळे म्हणून साऱ्यास धर्मांनी यास मान्यता दिलेली आहे, खरे तर ईश्वरी तत्त्वज्ञान असे सांगते की, ईश्वर हा अजय अमर आणि सूक्ष्म आहे, तो कुणालाही दिसत नाही, ती एक अदृश्य अशी शक्ती आहे, साऱ्या जगाला नियंत्रित करते, साऱ्या जगावर ईश्वराचीच सत्ता चालते, ईश्वर जर असा निर्गुण निराकार अदृश्य शक्ती असेल तर मग त्याला अमूर्त स्वरूपातून काढून मूर्त स्वरूप देणे आणि त्याच्या मुर्त्या बनवून त्या मुर्त्यांना संरक्षण देण्यासाठी माती दगडे सिमेंट वाळूचे देवळे बांधणे हे कितपत योग्य वाटते , मूर्तिपूजा म्हणजे केवळ ईश्वर भक्तीचे एक औडंबरच आहे, देवळे बांधणे सुद्धा हे एक अवडंबर आहे, तो एक लहान मुले खेळतात तसा तो एक खेळच आहे, म्हणजेच अज्ञानी लोकांचा तो खेळ आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये, असे असेल तर सर्व धर्मातील ही संकुचितता आणि अज्ञान सर्वांनी मान्यच केले पाहिजे. अन्यथा असे मानणे म्हणजे एक अंधश्रद्धाच होय.
देवाची धर्माची उपासनेची आणि परंपरेची चिकित्सा करणे हे जिवंत माणसाचे आणि ज्ञानी माणसाचे लक्षण होय, आणि यांची चिकित्सा न करणे म्हणजे आंधळेपणाने हे सारे स्वीकारणे म्हणजेच अज्ञान होय.
ईश्वर तसेच धर्म आणि ईश्वराची उपासना या गोष्टी मनुष्यनिर्मित असून यांची माणसाला का आवश्यकता वाटली, आणि ती ह्या 21व्या शतकात विज्ञान संशोधन ज्ञान-तंत्रज्ञान च्या जगात याची आवश्यकता आहे का, नैतिकता आणि या सर्व गोष्टीचा संबंध खरोखरच आहे का, या गोष्टीची समीक्षा आणि चिकित्सा होण्याची गरज आहे, असे झाले तरच आपण 21वे शतक पार करू शकू, अन्यथा सारा अनर्थ च, अशी परिस्थिती आहे.
लेखक :- दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक 16 डिसेंबर 2025, फोन 9420912209.


