शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुकातंर्गत सोनेगांव (बेगडे) गावाजवळुन वाहणाऱ्या उमा नदीच्या पात्रातुन रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.सोनेगाव (बेगडे) गावाजवळच्या नदीपात्रात वाळू चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याचे दिसून येते आहे.
चिमूर तालुक्यातील नदीचे पात्र वाळू चोर पोखरून टाकत असताना तलाठी,मंडळ अधिकारी,शांत बसून वाळू तस्करीची मजा घेत असल्याचे वास्तविक चित्र दृष्टीस पडत आहे.
करोडो रुपयांच्या अवैध रेती उत्खननाचे विदारक चित्र समोर असताना भरारी पथक कुठे गेले आहे हेच कळायला मार्ग नाही.
वाळू चोरट्यांनी सोनेगाव (बेगडे) नदी पात्रात धुमाकूळ घातला असून रात्रंदिवस वाळू उत्खनन केले जात आहे.
रात्रोच्या वेळी होणाऱ्या वाळू चोरी अंतर्गत वाहण्याच्या आवाजाने मौजा सोनेगाव (बेगडे) येथील नागरिकांची झोपमोड झाली आहे.झोपमोड करणे म्हणजे मानवी मनावर आघात करणे होय.
रात्रोच्या वेळी होणाऱ्या अवैध वाळू वाहतूकीमुळे काबाडकष्ट करणाऱ्या नागरिकांची झोपमोड होत असेल तर याचा गंभीर परिणाम आरोग्यावर पडतो आहे.
अवैध वाळू उपसा प्रकारामुळे मौजा सोनेगाव (बेगडे) येथील नागरिकांच्या आरोग्यावर पडणारा परिणाम गंभीर असल्याने चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी सदर अवैध वाळू वाहतूक तथा अवैध वाळू उत्खननाकडे लक्ष द्यावे अशी आर्त हाक तेथील नागरिकांची आहे.



