Home Crime अवैध वाळू तस्करीचा ३६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त… — अवैध वाळू तस्करीवर...

अवैध वाळू तस्करीचा ३६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त… — अवैध वाळू तस्करीवर शेघाट पोलिसांची मोठी कारवाई… — दोन प्रकरणांत ३६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

        दखल न्युज भारत

अमरावती :- वाढत्या अवैध वाळू तस्करीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांनी पूर्वीच अधीनस्त सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

        त्यानुसार दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थायी गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन शेघाट हद्दीत नियमित गस्त घालत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, काही आरोपी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक करत आहेत आणि ही माहिती मिळताच पथकाने तत्काळ सापळा रचून अवैध वाळू तस्करीविरुद्ध दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या.

         पहिल्या कारवाईत आरोपी निलेश सुमरलाल धुर्वे (वय ३०, रा. राजुरा बाजार) हा टाटा कंपनीच्या दहाचाकी हायवा वाहनातून अवैधरित्या १० ब्रास वाळू वाहतूक करताना ताब्यात मिळाला आणि पथकाने सदर हायवा वाहनासह वाळूसह एकूण २१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

         दुसऱ्या कारवाईत आरोपी राहुल बाबुराव वानखडे (वय २७, रा. अमरावती) हा दहाचाकी हायवा वाहनांतून ०७ ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना आढळला आणि पथकाने या प्रकरणातही अवैध वाळूसह वाहन मिळून १५ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

          या दोन्ही कारवायांत मिळून पोलीसांनी ३६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या तस्करीत सामील असलेल्या एकूण सहा आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन शेघाट येथे भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यानंतर पोलीसांनी सर्व संबंधित आरोपींचा शोध घेण्यासोबत अवैध वाळू वाहतुकीच्या साखळीचा तपास अधिक गतीने सुरू केला आहे.

          या सर्व कार्यवाहीत पोलीस अधीक्षक श्री.विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक श्री.पंकज कुमावत यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार तसेच पोलीस अंमलदार बळवंत दाभणे, रविंद्र बावणे, भूषण पेठे आणि पंकज फाटे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली आहे. पुढील तपास शेघाट पोलीस करीत असून अवैध वाळू तस्करीचे मूळ रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोलीसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.