पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत..
देसाईगंज..
‘व्हाईस ऑफ मीडिया’ (Voice of Media) आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य शिखर अधिवेशनाच्या (State Summit Convention) लोगोचे अनावरण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ.रामदास मसराम,माजी आ.कृष्णा गजबे, DPDC सदस्य तथा उद्योग आघाडी जिल्हाअध्यक्ष आकाश अग्रवाल यांच्या हस्ते वेगवेळ्या ठिकाणी उत्साहात करण्यात आले.
माजी आ.कृष्णा गजबे यांच्या कार्यालयात भाजपा माजी जिल्हाअध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी न.प.उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक शामराव बारई गुरुजी,व्हाॅईस ऑफ मिडीया गडचिरोली जिल्ह्याचे महासचिव विलास ढोरे,जिल्हा साप्ताहिक विंग चे संघटक प्रकाशचंद्र दुबे उपस्थित होते.
या कार्यक्रमात आगामी राज्य अधिवेशनाच्या आयोजनाची रूपरेषा,पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी उपक्रम आणि समाजात सकारात्मक पत्रकारितेची गरज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘व्हाईस ऑफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन नियोजित वेळापत्रकानुसार १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.राज्यभरातील पत्रकार,संपादक आणि माध्यम प्रतिनिधी या महत्त्वपूर्ण अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.



