Home Crime सागवान तस्कराना वनविभागाने ठोकल्या बेड्या…  — वनविभागची कारवाई…

सागवान तस्कराना वनविभागाने ठोकल्या बेड्या…  — वनविभागची कारवाई…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

दिनांक 31.10.2025 रोजी रात्रो सुमित दी. पुरमशेट्टीवार, वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे अधिनिस्त वनकर्मचारी यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन सागवान लाकडाची अवैध वाहतुक होणार असल्याचे कळाल्यावरुन सर्व कर्मचारी गस्तीवर असतांना धानोरा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 520 मध्ये पवनी ते धानोरा रोड रोपवाटिकेजवळ अवैध सागवान लाकुड वाहतुक करतांना दिसुन आले.

          तेव्हा वनकर्मचाऱ्यांनी त्यांना अटकाव करुन त्यांना वाहतुक परवाना असल्याबाबत विचारणा करण्यात आली परंतु त्यांनी कोणतेही लाकुड वाहतुकीचे कागदपत्र नसल्याचे आढळले.

         त्यानुसार 1) शेख मोहीन शेख सत्तार रा.पो.ता. धानोरा जि. गडचिरोली 2) अब्दुल हिफजान असांरी रा. शांन्ती नगर बरघाट, सिवणी मध्यप्रदेश 3) मंगेश सेयनु गावळे रा. डब्बा (दराची) ता. धानोरा जि. गडचिरोली या तिन व्यक्तीना अटक करुन त्यांची गाडी महिन्द्रा (पिकअप) वाहन क्रमांक CG 04 QL0325 सागवान लाकडाच्या मुद्देमालासह जप्त केले व प्रकरणाची पुढील चौकशी करिता आरोपीसह वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय दक्षिण धानोरा येथे आणण्यात आले.

         वनगुन्हा क्रमांक 06/2025/07789/194714 दिनांक 01.11.2025 अन्वये गुन्हा नोंदविला व सदर आरोपींना वनकोठडीत ठेवण्यात आले. करिता भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) ई, फ, 41,42,52 व 69 अन्वये कार्यवाही करण्यात आली.

        पुढील चौकशी रमेश कुमार, मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त, गडचिरोली आर्या व्हि. एस. उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली व अंबरलाल काशिराम मडावी, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) गडचिरोली वनविभाग, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित दि. पुरमशेट्टिवार, वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा, त्याचे अधिनिस्त वनपरिक्षेत्र दक्षिण धानोरा येथील वनकर्मचारी चौकशी करीत आहेत. नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अवैध वृक्षतोड करु नये व अवैध वृक्षतोडीची माहिती वनविभागास देण्यात यावी.