Home Maharashtra माजी राज्यमंत्री बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत सरकारला आज ५ वाजता पर्यंत...

माजी राज्यमंत्री बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत सरकारला आज ५ वाजता पर्यंत अल्टिमेट! — बुटीबोरी जाम होणार…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा नागपूरकडे कूच करत आहे.वर्धावरुन निघालेला हा मोर्चा शेकडो किलोमीटरचा प्रवास करत महाएल्गार सभेसाठी नागपुरात पोहोचणार आहे. 

           माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना आधिच सांगितले आहे की,तुम्ही चार ते पाच दिवसांचा वेळ काढून या व सोबत जेवणाची सोय असावी, शेतकऱ्यांचे कर्ज कशे माफ होत नाही तर बघूया,कर्जमाफी व शेतमालाला योग्य भाव घेऊनच घरी परतूया…

    कर्जमाफी,हमीभाव,शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सरकारला लेखी निर्णयाचा अल्टिमेटम दिला आहे.

          शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे.हा मोर्चा १२ तासांहून अधिक साधारण १३० किलोमीटरचा प्रवास करून रात्री उशिरा वर्धा जिल्ह्यातील सुकळी बाई गावात पोहोचला. 

        प्रचंड उत्साह आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर हा मोर्चा आज नागपूरकडे कूच झाला आहे.यावेळी नागपुरात महाएल्गार सभा घेऊन बच्चू कडू सरकारला जाब विचारणार आहेत.

       बैठक जर वांझोटी झाली,तर काही फायदा नाही

याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतली.यात त्यांनी स्पष्ट केले की,काल १५० किलोमीटरचा प्रवास केला असून,शेतकरी जात-पात बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. 

        माजी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी व्हॉट्सअॅपवर चर्चा केली असून,मागण्या कळवल्या आहेत.

          मी काल मुख्यमंत्र्यांना मेसेज केला आणि सांगितले की मी बैठकीला येणार नाही.मी तिकडे गेलो,तर इकडे दीड लाख शेतकरी एकटे पडतील.इकडे काही झालं तर कोण जबाबदार?बैठक जर वांझोटी झाली,तर काही फायदा नाही.सरकारने त्यांचा प्रतिनिधी पाठवावा.