शुभम गजभिये…
विशेष प्रतिनिधी…
चिमूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर शहर मिडिया प्रमुख मोहम्मद शफीक अब्दुल कादीर शेख यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढण्यासाठी शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांच्याकडे अर्ज केला आहे.
त्यांनी अर्जात म्हटले आहे की,मागील २० वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा सक्रिय पदाधिकारी असून आजच्या स्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिमूर शहर मिडिया प्रमुख या पदावर कार्यरत आहे.
माझे कर्तव्य,कार्य,माझी पक्षशिस्त आणि पक्षनिष्ठा बघावे व मला नगरपरिषद चिमूर प्रभाग ४ मधून पक्ष तिकीटावर निवडणूक लढण्याची अल्पसंख्याक कोट्यातून संधी द्यावी अशी मागणी मोहम्मद शफीक अब्दुल कादीर शेख यांनी चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांच्याकडे केली आहे..



