Home Political आळंदी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १० मधून शिवसेना (शिंदे गट) च्या संगीता राहूल...

आळंदी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १० मधून शिवसेना (शिंदे गट) च्या संगीता राहूल चव्हाण रणांगणात..!

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी, ता. २० : आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असताना प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून संगीता राहूल चव्हाण यांनी दमदार उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. कार्यतत्पर, सेवाभावी आणि जनसंपर्कात तत्पर असलेल्या चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

         संगिता चव्हाण या गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असून, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबनासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. परिसरातील स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती अशा विविध प्रश्नांवर त्या स्वतः पुढाकार घेऊन काम करत असल्यामुळे नागरिकांचा विश्वास त्यांना मिळाला आहे.

         शिवसेना शहरप्रमुख राहूल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे काळे कॉलनी परिसरातील मेन रोड लगत असलेले ड्रेनेज लाईनचे महत्त्वाचे काम मार्गी लागले आहे. हे काम मंजूर करून आणण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून प्रभाग क्रमांक १० मधील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. या माध्यमातून परिसरात विकासकामांची गंगा सुरू झाल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

        संगिता चव्हाण म्हणाल्या, माऊलींच्या कृपेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील प्रत्येक भागात विकासाची गंगा आणण्याचा माझा निर्धार आहे. महिलांचा सशक्त सहभाग आणि पारदर्शक कारभार हीच माझी प्राथमिकता राहील.”

      दरम्यान, प्रभाग क्रमांक १० मध्ये विविध पक्षांचे इच्छुक मैदानात उतरले असले तरी, शिवसेना (शिंदे गट) च्या संगीता राहूल चव्हाण यांच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि जनतेशी असलेल्या घनिष्ट संपर्कामुळे ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.