Home Crime चांदूर बाजारमध्ये अवैध गांजा विक्री करणारा ताब्यात, ४.२७ किलो गांजा जप्त…

चांदूर बाजारमध्ये अवैध गांजा विक्री करणारा ताब्यात, ४.२७ किलो गांजा जप्त…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

       दखल न्युज भारत 

अमरावती :- अवैध गांजा विक्री प्रकरणी एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन चांदूरबाजारच्या हद्दीत सापळ्यात अडकवून धडक कारवाई केली. ही कारवाई पोलिसांच्या गोपनीय माहितीवरून झाली, ज्यात अन्वर हुसेन अहमद हुसेन (वय ३८, रा. ताजनगर, चांदूर बाजार) हा मुख्य आरोपी ताब्यात आला. झडतीत ४.२७१ किलो अवैध गांजा जप्त केला गेला, ज्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे ८२,७५० रुपये आहे.

         पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर आणि त्यांच्या पथकाने पोलीस स्टेशन चांदूरबाजार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की अन्वर हुसेन दुपारी परसोडा फाटा जवळील तिरुपती मंगल कार्यालया समोर अवैध गांजा विक्रीसाठी येणार आहे. ही माहिती मिळताच पोलीसांनी त्वरित सापळा लावला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

        सापळ्यातील कारवाईत जप्त केलेला गांजा आणि आरोपी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन चांदूरबाजारच्या ताब्यात देण्यात आला आहे.

         ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री किरण वानखडे व श्री अशोक जाधव, तसेच ठाणेदार पोलीस स्टेशन चांदूरबाजार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कारवाईमध्ये सपोनि उल्हास राठोड, पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर, अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, नरेंद्र मुळतकर, संकेत चोरे, व चालक संजय प्रधान यांनी सक्रिय सहभाग घेतला.