Home देशविदेश बुळाला आग लावल्याशिवाय शेक लागत नाही…

बुळाला आग लावल्याशिवाय शेक लागत नाही…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

        “भ्रष्ट यंत्रणा,भ्रष्टाचार करणेवाल्यांचीच आब शाबूत ठेवतय,असे धोरण सध्या सुरू आहे.तद्वतच कधी बिनधास्त तर कधी आडमार्गाने भ्रष्टाचारातंर्गत येणाऱ्या रुपयामुळे मस्तावलपणाचा माज त्यांना बऱ्यापैकी चढलेला असतो,हे सुद्धा भ्रष्ट व्यक्तींच्या बोलण्यातून,कृतीतून दिसून येते आहे.

         अशा भ्रष्टाचाऱ्यांच्या बुडाला आग लावल्याशिवाय त्यांना योग्य व अयोग्य कळत नसल्याचे त्यांच्या अहंकारी वृत्तीमुळे पुढे आले आहे…

         महाराष्ट्र राज्य,भ्रष्ट्राचारात अव्वल स्थानावर असलेला असेल तर हा भ्रष्ट्राचार अवैध मार्गाचा किंवा बोगस कामांचा आहे एवढे नक्की!..”किंवा,विविध कार्यालयातील कामातंर्गत मिळवलेली अवैध कमाई आहे असेही म्हणता येईल…

          अवैध मार्गाने कमावलेल्या कमाईचे इन्कमटॅक्स संबंधित व्यक्तींकडून दरवर्षी भरल्या जात असले,तरी मोठ्या प्रमाणात वाढलेली कमाई ही कुठूण आली? यासंबंधाने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कठोर कायदा करायला नको का?…

         अवैध मार्गाने कमावलेल्या रुपयांची अनेकांना चढलेली मस्ती किंवा पदाची चढलेली नशा,ही कुठल्यातरी सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखालची असते हे लपूनछपून नाही,तरीही त्यांची सर्व बाजूंनी सुरु असलेली झाकबेंड आणि सावरासावर ही नितिभ्रष्टतेमध्ये मोडतय…

       राजकारणी,पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी,कर्मचारी,हेच कुंपण खात असतील तर शेत भक्ष होणारच!,म्हणूनच यांच्या बुडाला आग लावल्याशिवाय शेक लागत नाही,हे सत्य आहे…

            प्रत्येक शासकीय कार्यालयातंर्गत होणारी कामे,ही अंदाज पत्रकीय आराखड्यानुसार आणि शासनाच्या धोरणानुसार होत नसतील तर भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे सरळ सुत्र आहे….

          याचबरोबर अवैध गौण खनिज उत्खनन,दारु,सट्टा,जुगार अन्वये अवैध धंदे,यामुळे सुध्दा बरेचजण मालामाल झाले आहेत.यामुळेच भ्रष्ट मार्गाने कमावलेली कमाई,योग्य व कायदेशीर राहात नाही.

          भ्रष्ट राजकारण्यांनी व अधिकाऱ्यांनी देशातील नागरिकांना वेठीस धरण्यासाठीच भ्रष्ट कारभार सुरू केलाय,हे वास्तव आहे!…

           यांच्या बुडाला आग जनतेंनी वेळीच लावली पाहिजे.नाहितर नितिभ्रष्ट व भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी देशातील नागरिकांना खोकला बनवतील आणि अर्थहीन करतील याबाबतचे सत्य समोर आहे….