औरंगाबादच्या सर्व संविधाननिष्ठ ” आम्ही भारताच्या लोकांचे ” अगदी हृदयापासून आभार….
ज्याप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्राची प्रत्येक चळवळ ही संपूर्ण देशात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केल्या जाते. अशा बिकट प्रसंगातून शांततेकडे वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न नेहमीच या महाराष्ट्रात औरंगाबाद शहराने केलेला आहे. मग ती नामांतर चळवळ असो, 56 मराठा मोर्चाची सुरुवात असो, अगदी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची मुंबईत जाऊन राजकारणी नेत्यांच्या उरात धडकी भरवणारे मोर्चे असो.
एकंदरीत, काळ कितीही सोकावला, तरी त्याला वठणीवर आणण्याचे काम या पुरोगामी महाराष्ट्राने त्यातल्या त्यात विशेषतः याच ऐतिहासिक औरंगाबाद शहराने केले आहे. कदाचित हा वैचारिक चळवळीचा वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापन केलेल्या दूरदृष्टीचा परिणाम असू शकेल.
किंवा निजामाच्या अन्यायकरक मानसिकतेतून निर्माण झालेली ही मराठवाडी क्रांतिकारक विचारसरणी असू शकेल, किंवा मराठवाडा ही संतांची भूमी असल्यामुळे हा प्रभाव असेल.
किंवा हा सर्व क्रांतीच्या विचाराचा हा समिश्र परिणाम असेल….!
परंतू , एवढे निश्चितच कबुल करावे लागेल की, संपूर्ण देशात RSS ने सत्तेच्या / पैश्याच्या बळावर भीतीचे वातावरण निर्माण केलेले असतानाही आपल्या औरंगाबाद शहराने मात्र सर्व संविधाननिष्ठ अल्पसंख्यांक बंधू आणि भगीनींनी काल जो या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याच्या संविधानविरोधीवृत्तीच्या विरोधात……
मुक महामोर्चा काढला, तो देशाला दिशादर्शक ठरणारा आहे…!
म्हणून या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी झालेले सर्व संविधाननिष्ठ जबाबदार नागरिक, तसेच ज्यांची या मोर्चात सहभागी होण्याची ईच्छा असूनही परंतू ,काही हतबल कारणाने सहभागी होऊ शकले नाहीत, परंतू त्यांचे हृदय या विचाऱासोबत होते. अशा सर्वांचे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजन जिवंत असल्याचा पुरावा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार आणि धन्यवाद…………
( प्रत्यक्ष नावं घेऊन आभार मानने शक्य नाही. तसेच कुणाचे नाव विसरले तर नाराजी होऊ नये. म्हणून हे सार्वजनिक आभार व्यक्त करतो )


