भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
तहसील कार्यालय धानोरा येथे पुरवठा विभागात श्रीमती मोनिका राऊत यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून नुकतेच रुजू झाले त्या निमित्ताने सर्व धानोरा तालुक्यातील स्वस्त सरकारी दुकानदार संघटना यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचा सत्कार केला यावेळी मोनिका राऊत मॅडम यांनी सर्व दुकानदारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
श्रीमती मोनिका राऊत,निरीक्षण अधिकारी यांनी सांगितले की,सर्व दुकानदारांनी दिवाळीपूर्व लाभार्थ्यांना विहित वेळेत धान्याचे वाटप करून 100% ट्रांजेक्शन पूर्ण करावेत.
ज्या गावांमध्ये नेटवर्क संदर्भात अडचणी आहेत, त्यांचा नियमित आढावा घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यकतेनुसार संबंधित अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार सेतू केंद्रांद्वारे शिधापत्रिकेच्या कामे (नवीन कार्ड, नाव कमी, नाव वाढ इत्यादी) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे धानोरा तालुक्यातील सेतू केंद्रांना यासंदर्भात सूचना देण्यात येणार आहेत.
तसेच मृत लाभार्थ्यांची व विवाहित मुलींची नावे कार्डमधून कमी करण्याची विशेष मोहीम सध्या राबविण्यात येत असून, सर्व दुकानदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही निरीक्षण अधिकारी श्रीमती मोनिका राऊत निरीक्षण अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
या स्वागत समारंभ प्रसंगी कनिष्ठ लिपीक तुमराम.शिडाम मॅडम.गोदाम लिपीक हरड.आकुलवार यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटने चे तालुका अध्यक्ष जाकीर कुरेशी आणि धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अभय इंदुरकर यांनी केले तर आभार समीर कुरेशी यांनी मानले.



