भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
सर्व दुकानदारांनी दिवाळीपूर्व लाभार्थ्यांना विहित वेळेत धान्याचे वाटप करून 100% ट्रांजेक्शन पूर्ण करावेत.
ज्या गावांमध्ये नेटवर्क संदर्भात अडचणी आहेत, त्यांचा नियमित आढावा घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यकतेनुसार संबंधित अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार सेतू केंद्रांद्वारे शिधापत्रिकेच्या कामे (नवीन कार्ड, नाव कमी, नाव वाढ इत्यादी) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे धानोरा तालुक्यातील सेतू केंद्रांना यासंदर्भात सूचना देण्यात येणार आहेत.
तसेच मृत लाभार्थ्यांची व विवाहित मुलींची नावे कार्डमधून कमी करण्याची विशेष मोहीम सध्या राबविण्यात येत असून, सर्व दुकानदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, ज्या ग्राहकांची ई केवायसी राहिलेले आहे त्या ग्राहकाने आपली एक एवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अन्यथा धान्य बंद होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर ये केवायसी करावे असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी आढावा बैठकीत केले.
या प्रसंगी पुरवठा निरीक्षण मोनिका राऊत पुरवठा निरीक्षण अंबादे कनिष्ठ लिपीक तुमराम स्नेहा चौधरी शिडाम मॅडम.गोदाम लिपीक हराड गोदाम रक्षक मनोज आकुलवार गोदाम व्यवस्थापक यावेळी सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटने चे तालुका अध्यक्ष जाकीर कुरेशी आणि धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



