भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम.रमेश,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुळराज,अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी तथा ASP अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12/10/2025 रोजी पोलीस स्टेशन कटेझरीचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस तसेच SRPF गट 11 चे 19 अंमलदार नक्षल विरोधी अभियान राबवत असताना कटेझरी पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर दराची जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी बांधून ठेवलेले नक्षल स्मारक उध्वस्त करण्यात आले.
हे स्मारक नक्षलवाद्यांच्या दहशतीचे व अस्तित्वाचे प्रतीक म्हणून बांधण्यात आले होते .अशा प्रकारची स्मारके स्थानिकांमध्ये भीती निर्माण करतात,तसेच नक्षलवादस अप्रत्यक्ष प्रोत्साहन देतात,पोलीस स्टेशन कटेझरीचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की समाजात दहशत पसरवणारी प्रतिके पाडून त्याऐवजी शांतता,सुरक्षितता व विकासाचा मार्ग दृढ करणे हाच आमचा उद्देश आहे.
सदर नक्षल स्मारक पाडत असताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली.संपूर्ण परिसर BDDS टीम कडून सर्च करण्यात आला.नक्षल स्मारक पाडत असताना गावकऱ्यांचे सहकार्य मिळाले.
त्यामुळे स्थानिकांच्या साहकार्याने स्मारक पाडण्यात आले.व त्याठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले अशी माहिती प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन कटेझरी यांनी दिली आहे.



