Home Maharashtra चिमूर वनपरिक्षेत्रातंर्गत मौजा खापरी (धर्मू) परिसरात १ महिन्यापासून झाडांची अवैध कत्तल सुरू…....

चिमूर वनपरिक्षेत्रातंर्गत मौजा खापरी (धर्मू) परिसरात १ महिन्यापासून झाडांची अवैध कत्तल सुरू…. — वनपाल रामदास नैताम करतात तरी काय? — झाडाची बेकायदेशीर कत्तल करणारा मुजोर व्यक्ती नागपूरचा,मागिल ७ वर्षांपासून करतोय झाडांची कत्तल… — शेतकऱ्यांच्या शेतीतील,नदी थडव्यावरील व रोडवरील झाडांची कत्तल करणारा गोरखधंदा कुणाच्या आशीर्वादात?

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

       सातत्याने १ महिन्यांपासून नागपूरचा एक व्यक्ती आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भिसी वनपाल यांच्या कार्यक्षेत्रात झाडांची कत्तल बेकायदेशीर करतो आहे.

            तरी देखिल भिसी वनपाल रामदास नैताम हे चूप कसे काय आहेत?हा प्रश्न निर्माण होतो आहे.याचबरोबर कर्तव्यात असलेले वनरक्षक झोपा काढतात काय? हा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

          काही शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे शेतकऱ्यांच्या विना परवानगीने कटाई केले असून रोडवरील सुध्दा झाडांची कटाई सुध्दा या मुजोर व्यक्तींने दिनदहाळे केली आहे..

             या चोर व्यक्तींनी मागच्या वर्षी नदी थडव्यावरील बेकायदा झाडे तोडली होती.याच्या बेकायदेशीर झाडे तोडण्यावर चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी व तहसीलदार चिमूर हे कायदेशीर बंधने का म्हणून आणित नाही? हा एक चिंतेचा विषय ठरत आहे.

              नागपूरच्या व्यक्ती द्वारे हजारो झाडांची होणारी सर्रास कत्तल चिमूर तालुक्यातील पर्यावरणाचे संतुलन बिघडवणारी असून शेतीच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम पाडणारी आहे.

           याचबरोबर चिमूर तालुक्याला जंगलमुक्त करणारी आहे.झाडे हे आक्सिजन देण्याचे काम करतात व धूप कमी करण्याचे काम करतात.असे असताना उष्ण वातावरणाची झडा चिमूर तालुक्यातील नागरिकांना देण्यासाठी त्या मुजोर झाडे तोडणेवाल्याला चिमूर तहसीलदार व चिमूर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी मोकळे सोडले असल्याची चर्चा चिमूर तालुक्यातील नागरिक करीत आहेत,या चर्चेचे काय? हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे..

           भिसी वनपाल रामदास नैताम यांनी वेळीच दक्ष होऊन,कटाई केलेला झाडांचा माल जप्त करावा व त्या झाडे तोडणाऱ्या व्यक्तींवर उचित कायदेशीर कारवाई करावी याबाबत त्यांनी विचार करणे आवश्यक आहे..

              दिनदहाडे झाडांची कत्तल होत असताना वनविभागाचे वनपाल आणि वनरक्षक हे दुर्लक्ष करतात,या त्यांच्या कर्तव्याला काय म्हणावे?