शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
अशोकराव गिरीधरजी शेळके हे माजी माध्यमिक शिक्षक असून,विद्याकृषी विकास हायस्कूल,भुयार,जि.भंडारा येथे ते कार्यरत होते.
सरांचा जीवन परिचय…
(जय मल्हार)
जन्म: १० ऑक्टोबर १९६४ रोजी एका लहानशा खेड्यात काजळसर या गावी झाला.सुरुवातीला संपूर्ण कुटुंब नेरी (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथे स्थायिक झाले.
शिक्षण….
एम.ए.,बी.एड. (अर्थशास्त्र)
पूरक शिक्षण….
मराठी,इंग्रजी आणि हिंदी टायपिंग ६० शब्द प्रति मिनिट गतीने परीक्षा उत्तीर्ण.सलग चार वर्षे टायपिंग कोच म्हणून केवळ ₹७०/- मानधनावर सेवा बजावली.
स्वभाव….
शांत,प्रामाणिक,मनमिळावू आणि थोरामोठ्यांचा आदर करणारे.
बालपणीच्या आवडी….
कबड्डी आणि व्हॉलीबॉल खेळणे,वाचनाची विशेष आवड…
आवडता खेळ क्रिकेट…
क्रिकेट खेळामध्ये संघाचे नेतृत्व (कर्णधार), बॉलर व ओपनर बॅट्समन म्हणुन कामगिरी.
प्रेरणास्थाने….
डॉ.बाबासाहेब आंबेडकरराजमाता अहिल्यादेवी होळकर,छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,बाबा आमटे,डॉ.अण्णासाहेब डांगे (माजी ग्रामीण विकास मंत्री)
तसेच जनता दल पक्षाच्या विचारसरणीचा प्रभाव.
सामाजिक कार्याची सुरुवात….
१९८९ पासून,वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी भुयार येथील श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान पासून समाजकार्यास प्रारंभ.
१९८९ साली नेरी येथील एक धनगरीन बाईंनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा सरांना दाखवली.
त्यानंतर नेरी येथील सार्वजनिक गणेश उत्सवात,सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर पहिला कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.
काम करणाऱ्याला पैशांची गरज नसते,तर ध्येय उंच असावे लागते,या तत्त्वाचा प्रभाव त्यांच्या कार्यावर स्पष्टपणे दिसून येतो.
चिमूर परिसरातील उच्चविद्याविभूषित धनगर समाजातील असल्यामुळे,समाजसेवेची विशेष ओढ राहिली.
संघटनात्मक कार्य….
महाराष्ट्र राज्य धनगर समाज,चंद्रपूर या संघटनेचे पहिले अध्यक्ष,त्यानंतर प्रदेश सदस्य,संघटक आणि सध्या मुख्य वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून कार्यरत..
शैक्षणिक क्षेत्रातील गौरव….
प्रशासकीय अधिकारी विभागीय डेप्युटी डायरेक्टर नांदेडे यांच्या हस्ते व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील विभागीय पुरस्कार प्राप्त.
ध्येय….
कोणतेही कार्य वेळेत पूर्ण करणे समाजाच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे
समाजकार्यात नेहमी तत्पर राहणे.युवक-युवतींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व समाजकार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे,युवकांनी उच्च शिक्षण घेऊन सक्षम व्हावे,ही त्यांची अपेक्षा.
सरांचा संदेश….
“जीवनात प्रत्येकजण कधी ना कधी अपयशी होतो.” अपयशी म्हणजे FAIL. सरांच्या मते FAIL म्हणजे….
F – म्हणजे First,
A – म्हणजे Attempt,
I – म्हणजे In,
L – म्हणजे Learning,
बरेच समाज बांधव जीवनात अपयश आले की लगेच नकारात्मक होऊन नाही म्हणजे NO म्हणतात.
सरांच्या मते NO म्हणजे…
N – म्हणजे NEXT,
O – म्हणजे OPPORTUNITY,
शुभेच्छा संदेश…
अशा या उच्चविद्याविभूषित, संयमी,प्रेमळ,मनमिळावू व समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्वाला,महाराष्ट्र धनगर समाज महासंघ चंद्रपूर कडून व सर्व सकल धनगर समाज बांधवांकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या!
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक उघडे यांनी केले तर मार्गदर्शन सचिन शेरकी,श्रीकांत शेरकी म.ध.म.जि.प्र.प्र.चंद्रपूर,आनंद धनविजय नागपूर यांनी केले.
आभार प्रदर्शन सचिन शेरकी यांनी केले….




